MIDC esakal
नाशिक

Nashik News : राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाढत्या दुर्घटनांबाबत आराखडा करा : डॉ. गोऱ्हे

Nashik : राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृतिआराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

सतिश निकुंभ

Nashik News : राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृतिआराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. विधान भवन येथे पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, महानगर क्षेत्रांसह राज्यभरात होणाऱ्या औद्योगिक दुर्घटनांविषयी उपाययोजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. (Nashik Dr Neelam Gorhe statement for industrial areas of state marathi news)

त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस औद्यागिक सुरक्षा विभागाचे संचालक देवीदास गोरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभडे- पाटील, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, रमेश चव्हाण, कैलास केंद्रे, संतोष वारीस, भरत कळसकर, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. शैलेश गुजर आदी उपस्थित होते.

औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करणे महत्त्वाचे असल्याचे सांगून उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की महापालिका, औद्योगिक सुरक्षा, गृह, पर्यावरण विभाग यांच्या एकत्रित समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या धोकादायक पदार्थांचे नियमन होणे आवश्यक आहे. (latest marathi news)

त्यामुळे अतिरिक्त रसायन साठा ठेवून होणाऱ्या दुर्घटनावर काही प्रमाणात बंधन आणणे शक्य होईल, तसेच या रसायनांचा मर्यादित साठा व आवश्यक तो योग्य वापर होत असल्याबाबत खात्री करता येईल. औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने उद्योगांमध्ये अंतर्गत भागात सीसीटीव्ही बसवावेत, उद्योगांपर्यंत जाणारे रस्ते अग्निशमन यंत्रणा पोचेल असे असावेत, ग्रामीण भागासाठी लहान अग्निशमन यंत्रणा खरेदी कराव्यात, लहान अग्निशमन केंद्रे स्थापन करावीत, सर्व जिल्ह्यांनी त्यांची आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की प्रत्येक उद्योग आस्थापना यांना त्यांचे उद्योगामध्ये महिला कामगारांच्या लहान बाळांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करावा, सर्व कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडिट करावे, सर्व कामगारांना कारखान्यातर्फे विमा संरक्षण पुरविण्यात यावा, अपघातामध्ये मृत व जखमी कुटुंबांचे तत्काळ पुनर्वसन करावे, अपघातग्रस्त कुटुंबांना तत्काळ कारखान्याने आर्थिक मदत करावी, अपघातबाधित मुलांचे व मुलींचे शिक्षणात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी, आपत्ती व्यवस्थापन कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT