Nashik News : अंबडमधील IT पार्क इमारत 22 वर्षांनंतर अखेर झिंटेक कंपनीकडे

Nashik : तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्या हस्ते सन २००३ मध्ये उद्‌घाटन करण्यात आलेल्या अंबडमधील आयटी पार्क इमारत राजकीय इच्छाशक्ती व शासनाच्या उदासीन धोरणामुळे तब्बल २१ वर्षांपासून धूळ खात पडून होती.
IT park building
IT park buildingesakal

Nashik News : तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्या हस्ते सन २००३ मध्ये उद्‌घाटन करण्यात आलेल्या अंबडमधील आयटी पार्क इमारत राजकीय इच्छाशक्ती व शासनाच्या उदासीन धोरणामुळे तब्बल २१ वर्षांपासून धूळ खात पडून होती. पण, आता सदरची इमारत ही विदेशी गुंतवणूक करणाऱ्या झिंटेक कन्सल्टिंग या कंपनीने घेतली असून, सहा महिन्यांपासून इमारतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. (Nashik IT Park building in Ambad finally to Zintech company after 22 years marathi news)

लवकरच कंपनीचे उद्‌घाटन होणार असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. नाशिकमध्ये आयटी कंपन्यांचे जाळे यावे, यासाठी २०-२५ वर्षांपूर्वीच ‘निमा’, ‘आयमा’, लघुउद्योग भारती, नाईस आदी उद्योग संघटनांनी प्रयत्न करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे.

त्या अनुषंगाने अंबड औद्योगिक वसाहतीत मुख्य रस्त्यावरील सुमारे ४० पेक्षा जास्त भूखंड आयटी कंपन्यांसाठी आरक्षित करण्यात आले होते. अंबड एमआयडीसीतील अॅमेनिटी ५४- १/२ व सध्या पी. ३६ म्हणून ओळख देण्यात आलेल्या या तीन हजार ९४० स्क्वेअर मीटरच्या भूखंडावर भव्य अशी आयटी पार्क इमारत उभारण्यात आली.

या इमारतीचे उद्‌घाटन तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्या हस्ते झाले. या आयटी पार्क इमारतीसाठी पुढे विप्रो कंपनीनेही पुढाकार घेतला होता. पण, तत्कालीन राजकीय नेत्यांनी आमचं काय, असा सूर लावल्याने ही संधीही गमावली होती. त्यानंतर बरेच वर्षे ही इमारत पडून होती. (latest marathi news)

IT park building
Nashik News: अमृत महोत्सवापासून झेंडे व्यवसायिकांना ‘अच्छे दिन’! भारत स्वातंत्र्य झाल्यापासून प्रथमच मोठ्या प्रमाणात विक्री

‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे व ‘आयमा’चे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील, वरुण तलवारे, निखिल पांचाळ, नाशिकची आयटी असोसिएशन आदींनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे पाठपुरावा करीत या इमारतीतील काही गाळे दहा रुपये प्रति स्क्वेअर फूट भाडे आकारण्याचा निर्णय घेऊन जाहिरातही प्रसिद्ध केली.

पण, नाशिकमधील आयटी कंपन्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. शेवटी २७ मे २०२२ ला विदेशी गुंतवणूक असलेल्या झिंटेक कन्सल्टिंग या कंपनीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक निर्णय घेत ही इमारत ताब्यात दिली.

आयटी पार्क इमारत

अंबड एमआयडीसीतील प्लॉट नंबर पी. ३६ भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ तीन हजार ९४० स्क्वेअर मीटर आहे. यात एकूण २८ हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम करण्यात आले. भव्य तीनमजली इमारत ‘आयटी पार्क इमारत’ म्हणून ओळखली जाते. झिंटेक कन्सल्टिंग या कंपनीने ही इमारत १७.१९ कोटींची गुंतवणूक करीत ताब्यात घेतली आहे.

IT park building
Nashik News: वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन! 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात होणार रूपांतर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com