Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : घरविक्रीचे पैसे घेऊन ताबा न देता केली फसवणूक

Fraud Crime : घर विकत देण्याचे आश्वासन देऊन त्यापोटी सुमारे ३२ लाख रुपये घेतले. परंतु घराची खरेदी करून न देता त्यांच्या पैशांचा अपहार करून फसवणूक केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : घर विकत देण्याचे आश्वासन देऊन त्यापोटी सुमारे ३२ लाख रुपये घेतले. परंतु घराची खरेदी करून न देता त्यांच्या पैशांचा अपहार करून फसवणूक केली. पैसे मागितले असता संशयितांनी धमकी दिली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय सोमनाथ निमगुळकर, तनुजा संजय निमगुळकर अशी दोघा संशयितांची नावे आहेत. मिलिंद आनंद बच्छाव (रा. इच्छामणी बंगला, पखाल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०१७ मध्ये संशयितांनी बच्छाव यांना घर विकत देण्याचे आश्वासन दिले होते. (Fraud committed by taking house sale money without giving possession )

त्यापोटी त्यांनी बच्छाव यांच्याकडून ३१ लाख ८४ हजार रुपये घेतले. परंतु त्यानंतरही संशयितांनी घराची खरेदी करून दिली नाही. उलट त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करीत ते स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. यासंदर्भात पैशांची मागणी केली असता संशयितांनी त्यांना बघुन घेण्याची धमकीही दिली. त्यामुळे याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

प्लॉटचा केला नावावर

डॉ. अमोल महाजन (रा. कोनार्कनगर, आडगाव शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित किरण वसंतराव राजवाडे (रा. नाशिक) याने एप्रिल २०२३ मध्ये त्यांचा प्लॉट विक्री करून देतो असे म्हणून त्यांच्याकडून प्लॉटचे कागदपत्रे घेतली. त्यावरून संशयित राजवाडे याने बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्यात फेरफार करून डॉ. महाजन यांचा प्लॉट स्वत:च्याच नावावर करून घेत त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

Gas Cylinder Shortage : कुंपणच शेत खातेय! हॉटेल सुरू, पण घरगुती गॅस टंचाई; नागरिकांचा संताप टोकाला, बुकिंग करूनही प्रतीक्षा

Food Poisioning : शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना विषबाधा; सर्व विद्यार्थिनीं धोक्याबाहेर

SCROLL FOR NEXT