J.P Gavit esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरीत गुढीपाडवा ठरला महाविकास आघाडीला लाभदायी

Lok Sabha Constituency : माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या बंडखोरीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढलेली असताना महाविकास आघाडीला गुढीपाडवा दिलासादायक राहिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या बंडखोरीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढलेली असताना महाविकास आघाडीला गुढीपाडवा दिलासादायक राहिला आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आघाडी समवेत राहण्याची भूमिका जाहीर केली. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात माकपाने प्रचार थांबवला. पक्षाचे नेते व संभाव्य उमेदवार जे. पी. गावित यांनी महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याचे सांगितले. (Nashik Lok Sabha Constituency Gudi Padwa in Dindori was beneficial for Maha Vikas Aghadi )

महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या माकपाने राज्यातील दिंडोरी हा एकमेव मतदारसंघ मिळावा अशी मागणी केली होती. आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) मिळाली. त्यामुळे माकपाचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन मतदारसंघाची मागणी केली होती. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीला राहणार असल्याचे सांगण्यात आले.

त्यावर गावित यांचे पुत्र इंद्रजीत गावित यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव राष्ट्रवादीने त्यांना दिला होता. मात्र, हा प्रस्ताव गावित यांच्याकडून नाकारण्यात आला. त्यानंतर, जे. पी. गावित यांनी स्वतः राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. परंतू, राष्ट्रवादीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे 'माकपा'ने मुंबईत 'पॉलिट ब्युरो'ची बैठकीत दिंडोरी मतदारसंघाची मागणी लावून धरली.

मात्र, बैठकीतही महाविकास आघाडीत असल्याचे सांगण्यात आले. त्यात या मतदारसंघातून माजी आमदार जे. पी. गावित उमेदवारी करतील असे सांगत, गावित यांनी मतदारसंघात भेटीगाठीदेखील सुरू केल्या होत्या. विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेण्यात येत होते. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली होती. गुडीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी (ता.९) महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची पत्रकार परिषद झाली. (latest marathi news)

त्यात माकपा आघाडीत सहभागी असून, कोणत्याही जागेवर उमेदवार नसले तरी त्यांच्याकडून पाठिंबा मिळाला असल्याचे जाहीर करण्यात आले. या पत्रकार परिषदेनंतर, दिंडोरी मतदारसंघातदेखील माजी आमदार गावित यांनी प्रचार थांबवला. त्यामुळे गुढीपाडव्याचा मुहूर्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला लाभदायी ठरला असल्याची चर्चा आहे.

ही माकपाची ताकद

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे पेठ, सुरगाणा, कळवण यांसह दिंडोरी मतदारसंघात विविध आदिवासी भागात चांगला प्रभाव आहे. सन २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माकपा उमेदवार गावित यांनी १ लाख ५ हजार ३५२ मते घेतली होती. सन २०१४ च्या निवडणुकीत माकपाने येथे उमेदवारी केली नव्हती. तर, सन २०१९ च्या निवडणुकीत माकपा उमेदवार गावित यांनी १ लाख ९ हजार ५७० मते घेतली होती.

''माकपाने दिंडोरी मतदारसंघाची मागणी केली होती. परंतू, महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्तव्य म्हणून मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार. माकपा महाविकास आघाडी समवेत प्रचारात उतरेल.''- जे. पी. गावित (माजी आमदार, कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT