
Nashik Lok Sabha Constituency: देवळाली विधानसभा मतदारसंघाचे तब्बल पाच वेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी मंत्री बबन घोलप यांच्यासह नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. नाराजीची दखल न घेतल्याने घोलप यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र केल्याचे सांगितले. (Nashik Lok Sabha Constituency Sanjay Pawar in Shinde group along with Gholap )
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकारण तापले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ उमेदवारीवरून सध्या चर्चेत आला आहे, त्यात आज उबाठा गटाला धक्का बसला. माजी मंत्री घोलप यांनी आज जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून घोलप यांना उमेदवारी हवी होती परंतु मागील वर्षाच्या अखेरीस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतून माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना पक्षात प्रवेश दिला, तेव्हापासून घोलप नाराज आहेत.
नाराजी संदर्भात खासदार राऊत यांच्याकडे देखील त्यांनी तक्रार केली. त्यावेळेस राऊत यांना घोलप यांची समजूत काढण्यात यश आले. १५ फेब्रुवारीला घोलप यांनी शिवसैनिक पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला. त्यानंतर देखील उद्धव ठाकरे यांनी नाराजीची दखल घेतल्याने शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे घोलप यांनी आज सांगितले. (nashik political news )
दरम्यान नांदगाव चे माजी आमदार संजय पवार यांनी देखील आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दरम्यान घोलप यांच्या प्रवेशानंतर त्यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.
उत्तर न मिळाल्याने प्रवेश
दरम्यान आज सकाळी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत असताना घोलप यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली. नार्वेकर हा एक शिपाई आहे, त्यांचे ऐकून घेतले जाते मात्र आम्ही पक्षात पन्नास वर्षांपासून काम करत असताना देखील आमचे ऐकून घेतले जात नाही. पक्ष फुटत असताना देखील त्यांचेच ऐकले जाते, त्यांना एवढे महत्त्व का दिले जात आहे? मला संपर्क पदावरून का काढले, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही असे घोलप यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.