chhgan bhujbal esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency: ...तर शिवसैनिक भुजबळांचे काम नाही करणार; महायुतीत बेबनाव, सचिव चौधरी यांचा दावा

Lok Sabha Constituency : छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नसल्याचा दावा केल्यानंतर महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभेचा नाशिक मतदारसंघ पांरपरिक पध्दतीने शिवसेनाच लढणार असून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल असे सांगतानाच शिवसेनेच्या शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नसल्याचा दावा केल्यानंतर महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे. (Nashik Lok Sabha Constituency Shiv Sainik will not do work of Bhujbal marathi news)

दिवसभराच्या चर्चेनंतर नाशिकच्या जागेवरून महायुतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चौधरी यांनी यु-टर्न घेत, शिवसैनिक काम करणार नाही असे मला वाटते असे मत मांडल्याचा खुलासा केला. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. कल्याण लोकसभेच्या जागेवर देवेंद्र फडणवीस यांनीच डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर तातडीने नाशिकचा प्रश्न सुटणे अपेक्षित होते.

मात्र नाशिकच्या जागेचा तिढा दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. यापूर्वी शिवसेनेच्या शिंदे गटाने या जागेवर दावा करताना हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळेल असे जाहीर केले होते. परंतु त्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. भाजपने देखील नाशिकच्या जागेवर दावा केला. तर छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार असल्याने नाशिकच्या जागेवर दावा केला.  (nashik political news )

त्यानंतर अचानक भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली जाणार असून राजकारणाचा ‘माधव' पॅटर्न रुजविण्यासाठी भुजबळ यांनाच नाशिक मधून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. भुजबळ यांचेदेखील नाव अद्यापपर्यंत जाहीर झाले नाही. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाने देखील नाशिकचा दावा सोडलेला नाही.

गोडसे यांनाच उमेदवारी

उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते बबन घोलप यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला. ते म्हणाले, हेमंत गोडसे यांनी सलग दोनदा छगन भुजबळ व समीर भुजबळ यांना पराभूत केले आहे. शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला आहे.

त्यामुळे भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक भुजबळांच्या प्रचाराला येतील असे आम्हाला वाटत नाही. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेनेला मिळायला हवी असा दावा केला. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याप्रमाणे नाशिकमधून गोडसे यांची उमेदवारी एक -दोन दिवसात जाहीर होईल. घोलप यांच्या प्रवेशानंतर उबाठा गटाचे दहा ते बारा माजी नगरसेवक शिवसेनेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip BJP Leader Statement : कथित ऑडिओ क्लिपवर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल ०, यशस्वी जैस्वाल १७; भारताचा डाव ११३ धावांवर गडगडला, नागपूरचा यश राठोड एकटा भिडला

Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

SCROLL FOR NEXT