A banner put up in rural areas on behalf of the Maratha community against the state food and civil supplies minister Chhagan Bhujbal. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : उमेदवारी जाहीर होण्याआधीच छगन भुजबळांविरोधात बॅनरबाजी

Lok Sabha Election : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), की राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) निवडणूक लढविणार, हे अद्याप निश्‍चित नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), की राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) निवडणूक लढविणार, हे अद्याप निश्‍चित नाही. त्यात नाशिकमधून छगन भुजबळ उमेदवारी करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यावर त्याचे पडसाद ग्रामीण भागात दिसू लागले आहेत. भुजबळ यांच्याविरोधात ग्रामीण भागात बॅनरबाजी सुरू झाली असून, प्रवेशबंदीबरोबरच मतदान न करण्याचे आवाहन करण्यात आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (Nashik Lok Sabha Election Banner battle against Chhagan Bhujbal marathi news)

दुसरीकडे पोलिसांनी हस्तक्षेप करीत तत्काळ बॅनर हटविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. नाशिक लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे. महाविकास आघाडीतून राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाली; परंतु महायुतीत अद्यापही जागेचा तिढा सुटलेला नाही. पारंपरिक पद्धतीने शिवसेनेच्या शिंदे गटाने जागेची मागणी केली असून, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलनही झाले आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महायुतीत समावेश जवळपास निश्चित झाल्यावर मनसेकडूनही नाशिकच्या जागेची मागणी केली जात आहे. भाजपने धार्मिक शहर असल्याने नाशिकची जागा पक्षासाठी सोडावी, यासाठी पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयात अन्नत्याग आंदोलनही केले. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार असल्याने नाशिक लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असल्याची भूमिका घेतली. (latest marathi news)

दरम्यान, जागेबाबत निश्चिती नाही. जागा निश्चित झाल्यावर उमेदवार निश्चित होईल. त्यात अन्न व नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांचे नाव नाशिक लोकसभेसाठी चर्चेत आल्यावर मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नाशिकच्या जागेसंदर्भात अद्याप निर्णय झाला नाही. भुजबळ उमेदवारी करणार, या चर्चेनंतर सकल मराठा समाजाने विरोधाला सुरवात केली आहे. नाशिक रोड भागातील पळसे व शिंदे गावात भुजबळ यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली.

आरक्षण विरोधाचे निमित्त...

इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) मराठा आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेच्या ग्रामीण भागातून विरोध व गावबंदी, असे फलक झळकविण्यात आले. त्यामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT