Nashik Lok Sabha Election : गद्दारांना धडा शिकवा; वाजेंच्या भेटीत उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Lok Sabha Election : महाविकास आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
Mahavikas Aghadi candidate from Nashik Lok Sabha constituency Rajabhau Vaje met party chief Uddhav Thackeray. MP Sanjay Raut, District Chief Sudhakar Badgujar, Co-Communications Chief Datta Gaikwad, Vasant Geeta Municipal Chief Vilas Shinde, Jayant Dinde, Former Mayor Vinayak Pandey, Bhai Indulkar, Nirmala Gavit, Mushir Syed, Sanjay Chavan etc.
Mahavikas Aghadi candidate from Nashik Lok Sabha constituency Rajabhau Vaje met party chief Uddhav Thackeray. MP Sanjay Raut, District Chief Sudhakar Badgujar, Co-Communications Chief Datta Gaikwad, Vasant Geeta Municipal Chief Vilas Shinde, Jayant Dinde, Former Mayor Vinayak Pandey, Bhai Indulkar, Nirmala Gavit, Mushir Syed, Sanjay Chavan etc.esakal

Nashik Lok Sabha Election : महाविकास आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. श्री. वाजे यांनी गुरुवारी (ता. २८) शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा. (nashik Uddhav Thackeray appeal at Waje meeting in election marathi news)

पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन केले. पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी आमदार निर्मला गावित, महानगरप्रमुख विलास शिंदे, जयंत दिंडे, माजी महापौर विनायक पांडे, भाई इंदुलकर, मुशीर सय्यद, संजय चव्हाण, सचिन मराठे, अस्लम मणियार, महेश बडवे, देवानंद बिरारी, देवा जाधव, राहुल ताजनपुरे आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी वाजे यांना उद्देशून बोलताना ठाकरे म्हणाले, की नाशिकचा गड जिंकूनच या. आता ताकदीने प्रचार करा. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात घेतलेले जनहिताचे निर्णय, भारतीय जनता पक्षाने केलेली घरफोडी, गद्दारांनी पक्षाला दिलेला दगा जनतेपर्यंत पोहोचवून आपल्या उमेदवाराचा ताकदीने प्रचार करा, विजयी होऊनच या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.  (latest marathi news)

Mahavikas Aghadi candidate from Nashik Lok Sabha constituency Rajabhau Vaje met party chief Uddhav Thackeray. MP Sanjay Raut, District Chief Sudhakar Badgujar, Co-Communications Chief Datta Gaikwad, Vasant Geeta Municipal Chief Vilas Shinde, Jayant Dinde, Former Mayor Vinayak Pandey, Bhai Indulkar, Nirmala Gavit, Mushir Syed, Sanjay Chavan etc.
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये शिवसेनेचाच उमेदवार! खासदार गोडसे यांनीही थोपटले दंड

प्रारंभी वाजे यांनी आभार मानले. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, असे सांगितले. जिल्हाप्रमुख बडगुजर व सहसंपर्कप्रमुख गायकवाड यांनी वाजे यांना विजयी करण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाचे रान करेल, असा विश्वास व्यक्त केला.

रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिककडे रवाना झाले. इगतपुरी येथील घाटनदेवीचे दर्शन घेतल्यावर रॅलीद्वारे या पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे नाशिकमध्ये आगमन झाले. पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वाजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत शेकडो वाहनांसह हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.

Mahavikas Aghadi candidate from Nashik Lok Sabha constituency Rajabhau Vaje met party chief Uddhav Thackeray. MP Sanjay Raut, District Chief Sudhakar Badgujar, Co-Communications Chief Datta Gaikwad, Vasant Geeta Municipal Chief Vilas Shinde, Jayant Dinde, Former Mayor Vinayak Pandey, Bhai Indulkar, Nirmala Gavit, Mushir Syed, Sanjay Chavan etc.
Nashik Lok Sabha Election : राजाभाऊ वाजेंचे शक्तिप्रदर्शन; शिवसेना भवनात सत्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com