Ankit with marathon winner Poonam. esakal
नाशिक

TATA Mumbai Marathon : टाटा मॅरेथॉनमध्ये नाशिकने पाडली छाप!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई येथे झालेल्‍या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये नाशिकच्‍या धावपटूंनी आपली छाप सोडली आहे. नाशिकला सराव करत असलेला अंकित देशवाल याने अर्धमॅरेथॉन पुरुष गटात दुसरा क्रमांक पटकावला. नाशिकच्‍या पूनम सोनुने हिने महिलांच्‍या गटातून तिसरे स्‍थान राखले. डॉ. महेंद्र महाजन यांनीही अर्धमॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. (Nashik makes an impression in TATA Mumbai Marathon nashik news)

टाटा मुंबई मॅरेथॉन रविवारी (ता. १५) विविध गटांतून पार पडली. या स्‍पर्धेत जगभरातून धावपटू सहभागी झाले होते. नाशिकच्‍या धावपटूंचाही यामध्ये समावेश होता. येथील एकलव्‍य ॲथलेटिक्‍स ॲन्ड स्‍पोर्टस्‌ इन्‍स्‍टिट्यूट येथे प्रशिक्षण घेत असलेल्या अंकित देशवाल याने २१ किलोमीटरच्‍या अर्धमॅरेथॉन स्‍पर्धेत सहभागी होताना एक तास ५.४५ मिनिटे वेळात स्‍पर्धा पूर्ण केली.

यासोबत त्‍याने दुसरा क्रमांक पटकावला. या गटातून मुरली गावित याने एक तास ५.१६ मिनिटे वेळेत स्‍पर्धा पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. महिला गटातून २१ किलोमीटरच्‍या अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होताना पूनम सोनुने हिने एक तास २४.५६ मिनिटे वेळेत स्‍पर्धा पूर्ण करताना तिसरे स्‍थान राखले.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

या गटातून पारुल चौधरी हिने एक तास १५.०३ मिनिटांत स्‍पर्धा पूर्ण करून प्रथम, तर नंदिनी गुप्ताने एक तास २४.०९ मिनिटे वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. याशिवाय नाशिकलाच सराव करत असलेल्‍या नीलिमा ठाकोर हिने ४२ किलोमीटर अंतराच्‍या पूर्ण मॅरेथॉन स्‍पर्धेमध्ये पाचवे स्‍थान राखले.

तसेच सायकलिंगच्‍या क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले व ‘रॅम’सारखी खडतर स्‍पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केलेले डॉ. महेंद्र महाजन यांनीही अर्धमॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. तीन तास ५३.०५ मिनिटांमध्ये ही स्‍पर्धा पूर्ण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Pakistan Match Fixing : पाकिस्तानी फिक्सर, इंग्लंड दौऱ्यावर संशयास्पद घडामोडी! फोन जप्त, PCB कडून चौकशी; खूप मोठी नावं अडकणार?

SCROLL FOR NEXT