Nashik Market Committee esakal
नाशिक

Nashik Market Committee : नाशिक बाजार समिती नोकर भरतीची उठविली स्थगिती; तक्रार योग्य नसल्याचे अहवालात नमूद

Nashik : बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध पदाची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Market Committee : बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध पदाची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बेरोजगारांना तरुणांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले होते. मात्र, संचालक शिवाजी चुंभळे यांनी संबंधित भरती प्रक्रिया चुकीची असल्याची तक्रार राज्य शासनाकडे केली असता तातडीने चौकशी करून भरतीला स्थगिती दिली होती. त्याअनुषंगाने शासनाने संबंधित भरती प्रक्रियेची चौकशी केली. (Nashik Market Committee has lifted moratorium on recruitment marathi news)

त्यामध्ये चुंभळे यांनी केलेली तक्रार योग्य नसून असे चौकशीत समोर आले आहे. तशी नोंद अहवालात करण्यात आली असून, नोकर भरती स्थगिती उठवण्यात आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची नोकरभरती बाजार समिती कायद्यातील तरतुदी , शासनाकडील परिपत्रकीय आदेश आदींचा भंग करणारी आहे . त्यामुळे बाजार समितीची नोकर भरती रद्द करावी, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक शिवाजी चुंभळे यांनी पणन मंत्र्यांकडे केली होती.

यावर तातडीने पणन संचालकांनी आदेश काढून स्थगिती दिली होती. त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित करून अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेशित करण्यात आले होते. ही भरती सरळसेवा प्रक्रिया पारदर्शक होत असल्याचा अहवाल विभागीय सहनिबंधकांनी तयार केलेल्या त्रिसदस्य चौकशी समितीने पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधक यांना कळविला आहे.  ( latest marathi news )

तसेच अहवालात सदर भरती प्रक्रिया विरोधात केलेली चुंभळे यांची तक्रार योग्य नाही असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी उचित नसल्याचा स्पष्ट आदेश दिला आहे. त्यामुळे बाजार समितीची भरती होत असल्याने इच्छुक बेरोजगारांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे.

माजी सभापती तथा विद्यमान संचालक शिवाजी चुंभळे यांनी केलेली तक्रार केली होती. मात्र , शासनाने स्थगिती देत चौकशी समिती गठित करीत अहवाल सादर केला. यात तक्रार योग्य नसल्याच निर्वाळा देण्यात आला आहे. शासनाच्या अहवालातूनच बाजार समितीत झालेली भरती प्रक्रिया योग्य असे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT