Nashik News : ‘प्रादेशिक जलसंधारण’च्या अधिकारीपदी गितेंना बढती

Nashik : राज्यात विविध ठिकाणी रिक्त प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांच्या जागेवर जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे.
Haribhau Gite
Haribhau Giteesakal

Nashik News : राज्यात विविध ठिकाणी रिक्त प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांच्या जागेवर जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. नाशिकचे जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ कारभारी गिते यांची नाशिकमध्ये प्रादेशिक जलसंधारण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. विशेष म्हणजे मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही ते कार्यभार सांभाळतात. (Nashik Gite promoted to post of Regional Water Conservation Officer marathi news)

राज्यातील आठ प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांच्या बढतीचे आदेश मृद व जलसंधारण विभागाने बुधवारी (ता. १३) जारी केले. नाशिकचे हरिभाऊ गिते हे २२ फेब्रुवारी २०२२ पासून जिल्हा जलसंधारण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अकोला व नाशिकचा कार्यभार सांभाळत असताना ३१ मे २०२३ ला श्री. काळे यांच्या निवृत्तीनंतर प्रादेशिक जलसंधारण अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. ( latest marathi news )

Haribhau Gite
Nashik News : शिष्टाचार डावलून गोंडसेंच्या उमेदवारीचे वक्तव्य : आहेर

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार दोनचा आराखडा तयार करून त्याला मंजुरी मिळविण्यात श्री. गिते यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानाला त्यांनी गती दिली. पाण्याच्या योग्य नियोजनाशिवाय कृषीचा विकास शक्य होणार नाही.

त्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा हरिभाऊ गिते यांचा मानस आहे. या अनुभवाचा फायदा राज्य सरकारला होणार असून, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याने विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री. गिते यांचे अभिनंदन केले.

Haribhau Gite
Nashik News : तलाठी 'तात्यां’च्या निवाऱ्यासाठी ‘काकां’चे प्रयत्न फळाला! निफाड तालुक्यात नवीन 10 तलाठी कार्यालयातून कामे सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com