Crime News esakal
नाशिक

Nashik News : EPOS मशीन फेकून देणाऱ्या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : तालुक्यातील जातेगाव येथे स्वस्त धान्य दुकान क्र. ५७ चे संचालक सुभाष पवार यांना येथील स्वस्त धान्य दुकान क्र. ५६ चे ग्राहक आबा शिवराम राऊत याने शिवीगाळ करुन धान्य वितरणाचे ई- पॉज मशिन फोडले. पवार यांच्या तक्रारीवरुन नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जातेगाव येथील सुभाष पोपट पवार यांच्याकडे स्वस्त धान्याचे क्रमांक ५७ चे दुकान आहे. येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५६ ग्राहकांनी केलेल्या तक्रारींमुळे चौकशीअंती बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती व्यवस्था म्हणून सुभाष पवार यांच्या क्रमांक ५७ च्या दुकानातून डिसेंबर २०२१ पासून शासकीय आदेशानुसार ग्राहकांना जोडण्यात आले आहे.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

आबा राऊत यांनी शुक्रवारी (ता. १०) दुपारी एकच्या दरम्यान मद्यपान करून पवार यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यांची समजूत काढून नोव्हेंबर महिन्याचे धान्यही दिले. त्यानंतरही राऊत यांनी ऑक्टोबर महिन्यातील धान्याची मागणी करीत वाद घालण्यास सुरवात केली. त्याची खात्री व्हावी म्हणून ई- पॉज मशीनवर राऊत याच्या हाताच्या बोटांचा ठसा घेवून मागील महिन्याचे धान्य शिल्लक नसल्याचे लक्षात आणून दिले. असे असतानाही राऊत यांनी ई- पॉज मशीन फेकून दिले. त्यानुसार नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रामेश्‍वर गाढे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, पोलिस हवालदार मोरे, पोलिसनाईक अनिल गांगुर्डे, प्रदीप बागूल तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT