Latest Marathi News | बनावट विमान तिकिटे देवून प्रवाशांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airoplane Ticket Fraud Crime News

Nashik Crime News : बनावट विमान तिकिटे देवून प्रवाशांची फसवणूक

नाशिक : परदेशात जाणाऱ्या प्रवाशांकडून लाखो रुपये घेऊन बनावट तिकिटे हातावर टेकविणाऱ्या अनुप व अनया या दांपत्यांविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित दांपत्य फरार असून पोलिस दोघांचा शोध घेत आहे.

ॲड. दीपक पाटोदकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनुप अनिल सुगंधी व अनया अनुप सुगंधी ऊर्फ पौर्णिमा महाले (रा. गंगापूर रोड) यांनी जुना मुंबई महामार्गावरील हॉटेल रामा हेरिटेज नजीक व्हीआयपी शॉपिंग सेंटरमध्ये ऍम्बल हॉलिडेज ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला. (Fraud of passengers by issuing fake air tickets Nashik Crime News)

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

हेही वाचा: Nashik News : अंगणवाडी सेविकांना पुन्हा देणार मोबाईल?

परदेशात जाणाऱ्या प्रवाशांचे विमान तिकिटे, व्हिसा, पासपोर्ट पुरविण्याचे कामदेखील कंपनीच्या माध्यमातून केले जाते. अनुप व अनया यांनी काही प्रवाशांकडून लाखो रुपये घेऊन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यात मुंबईतील एका ट्रॅव्हल कंपनीचा एजंट सूरज माथुर (रा. मुंबई) याचाही समावेश आहे.

ॲड. पाटोदकर यांच्या मुलासाठी मुंबई- ॲमस्टरडॅम- मुंबई या प्रवासाची विमानाची तिकिटे तसेच विदेशातील हॉटेल बुकिंग त्याचप्रमाणे व्हिसा पासपोर्ट काढण्यासाठी तक्रारदाराकडून सुमारे लाख रुपये घेतले. संबंधितांकडे केएलएम रॉयल एअरलाईन्सच्या विमानाचे बनावट तिकिटे टेकविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटोदकर यांनी पैसे मागितले. परंतु पैसे परत न करता दांपत्यांनी नकार दिला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक एस. एम. मन्सूरी तपास करीत आहे.

हेही वाचा: Nashik News : स्मशानवासींनी देवींचे राज्यातील एकमेव मंदिर नाशिकममध्ये!