nmc esakal
नाशिक

NMC News : शहरात 7 वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय

NMC News : महापालिकेकडून आगामी आर्थिक वर्षात उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच वाहनतळांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिकेकडून (NMC )आगामी आर्थिक वर्षात उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच वाहनतळांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली वाहनतळ समिती गठित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात समावेशक आरक्षणाखाली विकसित झालेली ४ व गोदावरी नदी किनाऱ्यावर असलेल्या २, तसेच भालेकर हायस्कूललगत असलेल्या जागेमध्ये १ अशी सात वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (nmc Decision to develop parking )

यात साडेतीनशे चारचाकी, पाचशे दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्न यातून सुटणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते झाले तरी वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने वाहने रस्त्यावर लावली जात आहे. परिणामी बेशिस्ती बरोबरच अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. महापालिकेने यापूर्वी सर्वसमावेशक आरक्षणाखाली तीन वाहनतळ विकसित केली.

मात्र तेथे खासगी कामासाठी वापर केला जात आहे. तर वाहतुकीचा प्रश्न बघत असताना महापालिकेने वाहनतळ विकसित करण्यात आलेले नाही. स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत शहरात ३३ ठिकाणी पार्किंग व्यवस्थापन करण्यात आले होते. त्याची जबाबदारी ट्रायझेन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आली. पहिल्या टप्प्यात कंपनीमार्फत प्रायोगिक तत्त्वावर दहा ठिकाणी पार्किंग स्लॉट सुरू करण्यात आले.

मात्र कोरोनामुळे पार्किंग स्लॉट बंद करण्यात आले. त्यानंतर संबंधित कंपनीने १७ लाख रुपये रॉयल्टी सूट देण्याची मागणी केली व दुचाकीसाठी प्रतितास पाचऐवजी १५, तर चारचाकी १० ऐवजी ३० रुपये शुल्क वाढ मागितली होती. मात्र महापालिकेने संबंधित कंपनीबरोबरच करार रद्द केला. एकंदरीत शहरांमध्ये वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पहिल्या टप्प्यात आठ ठिकाणी वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

येथे होणार वाहनतळ विकसित

- भालेकर हायस्कूल मैदान,

- म्हसोबा पटांगण

- कॅनडा कॉर्नर

- मुंबई नाका

- मेन रोड

- सिता गुंफा

- यशवंत महाराज पटांगण

''वाहतुकीचा प्रश्‍न लक्षात घेता शहरात पहिल्या टप्प्यात सात वाहनतळ विकसित केली जाणार आहे.''- प्रशांत पाटील, उपायुक्त, वाहन समिती सदस्य, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईला

रक्तातील कावीळ कशी होते? कोणत्या अवयवावर ताण येतो? 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण!

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

BEST Bus Accident: भांडुप बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा, चालकाने प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही; ७०४ पानी आरोपपत्र

Iran Islamic Revolution: १९७८ चा रक्तरंजित उठाव… इराणमध्ये कशी झाली इस्लामिक राजवटीची सुरुवात, काय आहे इतिहास?

SCROLL FOR NEXT