Nashik News  esakal
नाशिक

Nashik News : छोट्या राधेयने आपल्या वाढदिवसाचा खर्च दिला मंदिर जीर्णोद्धारासाठी दान!

सकाळ वृत्तसेवा

नामपूर : वाढदिवसाचे लहान मुलांना प्रचंड आकर्षण असते. नवीन कपडे, केक, मिठाई, फुगे, सजावट, मित्रांना पाहुणचार आदींच्या माध्यमातून लहान मुले वाढदिवसाच्या दिवशी फुल टू धमाल करीत असतात. परंतु, येथील राधेय योगेश अलईने आपला वाढदिवस साजरा न करता अकरा हजार १११ रुपयांची रक्कम हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिल्याने अलई परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मोसम नदीच्या तीरावर गेल्या काही महिन्यांपासून लोकसहभागातून भव्य हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. वाढदिवसाला अनाठाई खर्च करण्यापेक्षा हा खर्च वाचवून हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारास देण्याचे राधेयने आपल्या आई- वडिलांना सांगितले. क्षणाचाही विलंब न लावता लॅब व्यावसायिक योगेश अलई यांनी जीर्णोद्धार समितीच्या सदस्यांना बोलावून अकरा हजार १११ रुपयांची रोख रक्कम सुपूर्द केली.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

अल्पवयीन राधेयच्या सामाजिक, अध्यात्मिक विचारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार, श्रीहरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद नेरकर, शिवछत्रपती सहकारी मंगल कार्यालयाचे माजी अध्यक्ष विलास सावंत, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT