nmc esakal
नाशिक

NMC News : महापालिकेत पुन्हा ‘जम्पिंग प्रमोशन’चा घाट; 3 उपअभियंत्यांची फिल्डिंग

NMC : जानेवारी महिन्यात सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाली नसतानाही वाट न पाहता प्रशासकीय राजवटीत तीन उपअभियंत्यांना ज्येष्ठता डावलून आडमार्गाने कार्यकारी अभियंता होण्याचे वेध लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : जानेवारी महिन्यात सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाली नसतानाही वाट न पाहता प्रशासकीय राजवटीत तीन उपअभियंत्यांना ज्येष्ठता डावलून आडमार्गाने कार्यकारी अभियंता होण्याचे वेध लागले आहे. त्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. यातून महापालिकेत अभियंता संवर्गात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. (nashik NMC Jumping Promotion again in Municipal Corporation marathi news)

त्याचा परिणाम सेवा, सुविधा पुरविण्याच्या मूलभूत कर्तव्यावर दिसून येत आहे. महापालिकेत कर्मचारी वर्गाबरोबरचं तांत्रिक संवर्गातदेखील मनुष्यबळाची समस्या आहे. परंतु या समस्येचा फायदा काही जण घेत आहेत. काही अभियंते मलाईदार खुर्च्यांवर ठाण मांडून बसले आहे, काही अभियंते महत्त्वाचा विभाग सांभाळून अतिरिक्त कार्यभारातून नसलेल्या कामाचा ताण प्रकट करत आहेत.

विशिष्ट लोकांचा वरदहस्त व बाह्य शक्तींच्या महापालिकेतील हस्तक्षेपामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या शिस्तीचा बोजवारा उडाला आहे. दोन वर्षांपूर्वी जम्पिंग प्रमोशनमधून काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले. माजी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांची त्यासंदर्भात नगरविकास विभागामार्फत चौकशी लावण्यात आली. परंतु चौकशीचा कागद अद्यापही महापालिका मुख्यालयापर्यंत अद्यापही पोचला नाही.

ज्यांनी चौकशीची मागणी केली. त्यांनी हाताची घडी, तोंडावर बोट ठेवले. अशा परिस्थितीत पुन्हा दोन वर्षांपूर्वीचाच कित्ता गिरविला जात आहे. काही अधिकाऱ्यांनी सहाय्यक अभियंता असतानाही उपअभियंता पद मिळविले. नियमानुसार सेवाज्येष्ठता यादी (जम्पिंग प्रमोशन) डावलून पदोन्नती मिळविली होती. आता पुन्हा त्याच मार्गाने उपअभियंता ते कार्यकारी अभियंता पद मिळविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. (latest marathi news)

अस्वस्थता निर्माण

नियमानुसार, सहाय्यक अभियंता ते उपअभियंता या पदोन्नती प्रक्रियेमध्ये सेवाज्येष्ठता यादीमध्ये वरिष्ठ क्रमांकावर रवींद्र पाटील होते. परंतु उपअभियंता सचिन जाधव यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली. याविरोधात पाटील न्यायालयात गेले. न्यायालयाने पाटील यांनी उपअभियंता पदावर तीन वर्षे पूर्ण न झाल्याने एक जागा सोडून पदोन्नती देण्याचा निर्णय दिला. त्याचा फायदा घेत उपअभियंता पदावर कार्यरत असलेल्या तिघांनी कार्यकारी अभियंतापदाच्या रिक्त जागांवर बसण्यासाठी फिल्डिंग लावल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे.

संघर्ष टोकाला, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

कार्यकारी अभियंतापदाच्या पाच जागा रिक्त आहे. यातील १ जागा अपंगांसाठी राखीव आहे. १ जागा रवींद्र पाटील यांना उपअभियंता पदावर तीन वर्षांचा अनुभव नसल्याने रिक्त ठेवण्याच्या सूचना आहेत. तीन कार्यकारी अभियंता पदावर बसण्यासाठी उपअभियंता असलेले नीलेश साळी, राजेश पालवे, नितीन राजपूत प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी साळी, राजपूत यांनी जंपिंग प्रमोशन घेतल्याचे बोलले जाते. विशिष्ट संवर्गातून एकदा पदोन्नती घेतल्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने पदोन्नती घेता येत नसली तरी तिघाही उपअभियंत्यांची कार्यकारी अभियंता होण्याची महत्वाकांक्षा शिगेला पोचली आहे. यातील प्रकाश निकम यांचा उपअभियंता पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला नाही.

त्यामुळे ते कार्यकारी अभियंतापदासाठी पात्र ठरत नाहीत. साळी, पालवे व राजपूत यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती मिळाल्यास सेवाज्येष्ठता यादीतील अनेक उपअभियंत्यांना साइड ट्रॅक व्हावे लागणार आहे. त्यातून संघर्ष टोकाला पोचला असून नियमबाह्य पदोन्नती झाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT