NMC News esakal
नाशिक

Nashik NMC News : सिंहस्थाच्या नावाखाली ‘होऊ द्या खर्च’! गावठाण स्वच्छतेसाठी छोटी वाहने खरेदी करणार

NMC News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १५१ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १५१ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये गावठाण भागातील स्वच्छतेसाठी वीस कोटी रुपयांचा खर्च करण्याचे नियोजन केले असून, यात छोट्या वाहनांच्या खरेदीचा समावेश आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या नावाखाली घनकचरा विभागाचा होऊ द्या खर्च चांगलाच चर्चेत आला आहे. (Nashik NMC name of Simhastha kumbh mela expenditure marathi news)

२०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४२ विभागांकडून खर्चाचा आढावा घेण्यात आला आहे. जवळपास अकरा हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार झाला असून यात साडेतीन हजार कोटी रुपये फक्त भूसंपादनासाठी आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागानेदेखील आराखडा सादर केला.

१५१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करताना पंचवटी व जुने नाशिक या गावठाणाच्या भागात स्वच्छतेसाठी छोटी वाहने खरेदी करण्यासाठी आहे. गावठाण भागामध्ये छोट्या गल्ली व बोळ असल्याने येथे मोठे वाहने स्वच्छतेसाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे वीस कोटी रुपये खर्च करून छोटी वाहने खरेदी करण्यासाठी खर्च अपेक्षित आहे.   (latest marathi news)

त्याचबरोबर सिंहस्थ कालावधीमध्ये गोदाघाट स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठीदेखील वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. जंतुनाशक औषधे फवारणीसाठी दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आला आहे.

निर्माल्य कलश खरेदी करणार

कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. गरजेमुळे मोठ्या प्रमाणात निर्माल्य व अन्य घनकचरा तयार होणार आहे. शहरात अस्वच्छता दिसू नये यासाठी जागोजागी निर्माल्य संकलन व कचरापेटी ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. साधूग्राममध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ५०० लिटर क्षमतेच्या ६० लाख रुपयांच्या पाण्याच्या टाक्या खरेदी केल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

Burnt Cash Found Kolkata : पश्चिम बंगालमध्ये कोट्यवधींच्या जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ! सुटकेसमध्ये भरलेला पैसा; टीएमसी नेत्याशी काय आहे कनेक्शन?

रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

Shendurwada News : डॉ. प्रशांत पटारे यांचा रोबोटिक शस्त्रक्रियांचा विक्रम! एका दिवसात १६ रोबोटिक शस्त्रक्रिया; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद....

SCROLL FOR NEXT