Nashik NMC News esakal
नाशिक

NMC News : देयकांची वाट न बघता, अदायगी; महापालिका कर विभागाच्या सूचना

NMC : महापालिकेचे देयके हातात मिळण्याची वाट न पाहता एसएमएस किंवा महापालिकेच्या वेबसाइटवरून देयकांची प्रिंट काढून करदात्यांनी घरपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिकेच्या विविध कर विभागाकडून मागील आर्थिक वर्षात दमदार वसुली झाल्यानंतर पुढील आर्थिक वर्षात पहिल्या पहिल्या तिमाहीत आगाऊ घरपट्टीची रक्कम भरणाऱ्या करदात्यांना सवलत देण्याबरोबरच आता महापालिकेचे देयके हातात मिळण्याची वाट न पाहता एसएमएस किंवा महापालिकेच्या वेबसाइटवरून देयकांची प्रिंट काढून करदात्यांनी घरपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ()

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी हवा असेल तर महापालिकांनी उत्पन्नात वाढ करण्याच्या स्पष्ट सूचना केंद्र व राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे अन्य स्रोत शोधताना घर व पाणीपट्टी वसुली शंभर टक्के करण्याकडे विविध कर विभागाचा कल आहे. दोन दिवसांपूर्वी संपलेल्या आर्थिक वर्षात महापालिकेकडून इतिहासात प्रथमच विक्रमी घरपट्टी वसुली झाली.

जवळपास २०६ कोटी रुपयांचा महसूल विविध कर विभागाने प्राप्त केला. यातील जवळपास २५ टक्के रक्कम ही आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे व जून या तीन महिन्यातच प्राप्त झाली आहे. या तीनही महिन्यात विविध कर विभागाकडून अनुक्रमे आठ पाच व तीन टक्के आगाऊ घरपट्टी अदा केल्यास सवलत दिली जाते. ऑनलाइन घरपट्टी अदा केल्यास अतिरिक्त पाच टक्के सवलत आहे.

मागील वर्षात विक्रमी वसुली झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता विविध कर विभागाने कर भरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा भाग म्हणून नवीन योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत देयकांची वाट न बघता एसएमएस किंवा महापालिकेच्या संकेतस्थळावरून देयकांची कॉपी प्राप्त करून आगाऊ घरपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (latest marathi news)

ऑनलाइन भरण्यासाठी अतिरिक्त सवलत

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण आठ (कराधान नियम) नियम ३९ व ४० अन्वये सन २०२४ व २५ या वित्तीय वर्षात मालमत्ता कराचे देयके nmetax.in व nmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या करदात्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक महापालिकेकडे अद्ययावत करण्यात आली आहे. अशा करदात्यांना एसएमएसद्वारे मालमत्ता कराची मागणी पाठविण्यात आली आहे.

त्यामुळे चालू आर्थिक वर्षात देयके ग्राहकांना देयके प्राप्त झाली नसली तरी संकेतस्थळावरून चालू आर्थिक वर्षाच्या मागणीची रक्कम अदा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात रक्कम अदा केल्यास आठ टक्के सूट त्या व्यतिरिक्त ऑनलाइन करांचा भरणा केल्यास सर्वसाधारण करात पाच टक्के सवलत किंवा जास्तीत- जास्त तीन हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. अशी माहिती कर विभागाचे प्रभारी उपायुक्त विवेक भदाणे यांनी दिली.

''मागील आर्थिक वर्षांमध्ये कर विभागाने २०६ कोटी रुपये मालमत्ता कराचे वसूल केले. त्यामुळे यंदा त्यापेक्षा अधिक वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी देयके हातात मिळण्याची वाट न बघता कर सवलतीचा लाभ घ्यावा.''- विवेक भदाने, प्रभारी कर उपायुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT