property tax
property tax Sakal
नाशिक

NMC Property Tax : 12 दिवसात तब्बल 13 कोटींची वसुली

सकाळ वृत्तसेवा

NMC Property Tax : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळवण्यासाठी महापालिकांना उत्पन्नात वाढ करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने महापालिकेकडून मालमत्ता कर सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत बारा दिवसात तब्बल १२ कोटी ९५ लाख रुपये मालमत्ता कर वसुल झाला असून, मागील वर्षाच्या तुलनेत तीन कोटी रुपयांनी अधिक वसुली झाली आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी हवा असेल तर उत्पन्नात वाढ करणे बंधनकारक आहे. (nashik NMC Property Tax Recovery of Rs 13 crore in 12 days)

त्याअनुषंगाने महापालिकेकडून उत्पन्नात वाढ करताना मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने एप्रिल, मे व जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात मालमत्ता कर एकरकमी अदा केल्यास आठ टक्के सूट आहे.

मे महिन्यात कर अदा केल्यास सहा टक्के, तर जून महिन्यात तीन टक्के सवलत आहे. सौरऊर्जा प्रकल्प, सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पाच टक्के सवलत आहे. गृहनिर्माण संस्था किंवा निवासी क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन कार्यान्वित असल्यास दोन टक्के अतिरिक्त सवलत आहे.

त्याचबरोबर ई-पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट वापरात आणल्यास पाच टक्के किंवा तीन हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देय आहे. मागील आर्थिक वर्षातदेखील महापालिकेकडून सवलत योजना लागू करण्यात आली.

वर्षभरात २०५ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला. विक्रमी कर वसूल झाल्याने महापालिकेकडून कर सवलत योजना लागू करताना सवलतीचे टक्केदेखील वाढविले. त्याचा परिणाम म्हणून १ एप्रिल ते १२ एप्रिल या दरम्यान बार कोटी ९५ लाख ९० हजार ७८५ रुपये वसूल झाले आहेत. अशी माहिती कर उपायुक्त विवेक भदाणे यांनी दिली.(latest marathi news)

विभागनिहाय घरपट्टी वसुली

विभाग एकूण वसुली

पंचवटी २,५५,७५,७९३

सिडको २,४२,०८,९००

नाशिक रोड १,८१,९४,४३५

सातपूर १,१८, ८७, ८५९

पश्चिम २,४१,४४,५२८

पूर्व २,५५,७५, ७९३

एकूण १२,९५,९०,७८५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT