Farmers participating in a march organized by the Marxist Communist Party. esakal
नाशिक

Nashik Protest News : लाल वादळ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

Nashik Protest : २१ फेब्रुवारीपासून चांदवड, निफाड, सुरगाणा, पेठ, दिंडोरीसह इतर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने आंदोलक पायी निघाले असून शेतकऱ्यांचे लाल वादळ सोमवारी (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Protest News : शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत मागण्या शासनाकडून मान्य करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासींच्या विविध संघटनांतर्फे माजी आमदार जीवा पांडू गावित गावित यांच्या नेतृत्वाखाली २१ फेब्रुवारीपासून चांदवड, निफाड, सुरगाणा, पेठ, दिंडोरीसह इतर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने आंदोलक (Protest) पायी निघाले असून शेतकऱ्यांचे लाल वादळ सोमवारी (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. (Nashik Protest farmer will hit collector office nashik news)

दरम्यान सर्व मागण्या मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचे महामुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार जीवा पांडू गावित व पायी मोर्चात निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनास दिला आहे.

नाशिक ते मुंबई लाँग मार्चच्या आंदोलनात मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्यांनी तत्काळ अंमलबजावणी सुरू करू असे आश्वासन दिले. मात्र नागरीकांना काहीही मिळाले नाही. उलट फसवणूक केल्याने जनता आता आक्रमक झाली आहे.

जोपर्यंत मागण्या मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता. २६) पासून बेमुदत महामुक्कामी आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार जीवा पांडू गावित, डॉ. डी. एल. कराड, सुभाष चौधरी, सावळीराम पवार, भिका राठोड, इंद्रजित गावित, इरफान शेख, वसंत बागूल, जनार्दन भोये, के.डी भोये, चंद्रकांत वाघेरे, उत्तम कडू,महेश टोपले, मंदाकिनी भोये, मनीषा महाले आदींनी केले आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT