Nashik Protest News: पेन्शनच्या मागणीसाठी मोर्चाऐवजी निदर्शने; कुटुंबीयांसह सहभागी होत शासनाचा निषेध

Pensioners protesting at the Eidgah Maidan for 'My Family-My Pension' and various demands by the Central Union of State Government Employees on Wednesday.
Pensioners protesting at the Eidgah Maidan for 'My Family-My Pension' and various demands by the Central Union of State Government Employees on Wednesday.esakal

Nashik Protest News : सरकारी-निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर नगर परिषद व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जिव्हाळ्याच्या अशा पेन्शनच्या मागणीसाठी बुधवारी (ता. ८) कुटुंबासह मोर्चाचे नियोजन केले होते. मात्र, मैदानावर जमल्यावर केवळ निदर्शने करीत कामगारांनी शासनाचा निषेध केला.

सरकारी- निमसरकारी- जिल्हा परिषद- शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका, नगरपालिका कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे नियोजन होते.

मात्र, ऐनवेळी मोर्चा रद्द करीत केवळ निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. (Govt semi govt teachers non teachers municipal council and employees protest gov demanding pension nashik news)

सरकारी कर्मचारी कृती समितीचे समन्वयक दिनेश वाघ, ‘सीटू’चे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, ‘आयटक’चे राज्य उपाध्यक्ष राजू देसले, संपर्कप्रमुख श्‍यामसुंदर जोशी, उपाध्यक्ष जितेंद्र पालवे, जिल्हा परिषद कर्मचारी संघाचे अध्यक्ष अरुण आहेर, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळू पाटील-बोरसे, वर्ग चार संघटनेचे उपाध्यक्ष राजू अहिरे, ज्ञानेश्वर कासार, विजय हळदे, मधुकर आढाव, रवी पवार, कैलास नागरे, जीवन आहेर, नीलेश गवळी आदींच्या नेतृत्वात आंदोलन झाले.

माझे कुटुंब-माझी पेन्शन

माझे कुटुंब-माझी पेन्शन या शीर्षाखाली काढलेल्या आंदोलकांनी नवीन सरकारी पेन्शन योजनेमुळे १७ वर्षांपासून राज्यातील कर्मचारी- शिक्षक नाडले जात आहेत. निवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळे जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी, या प्रमुख मागणीसह विविध १८ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

Pensioners protesting at the Eidgah Maidan for 'My Family-My Pension' and various demands by the Central Union of State Government Employees on Wednesday.
Nashik News: प्रभाग 7 मध्ये दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके; तलावाच्या दुरवस्थेवरून राष्ट्रवादी भाजप शिंदे सेना संघर्ष

त्यात, सहा महिने उलटूनही जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करणाऱ्या समितीने अहवाल दिलेला नाही. उर्वरित १७ मागण्यांबाबत सचिव स्तरावर चर्चा होऊनही निर्णय होत नाही. अशातच कंत्राटी तत्त्वावर कामगार भरतीचे धोरण जाहीर झाले. शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या कलम ३५३ मध्ये सुधारणा, तसेच शिक्षण क्षेत्राचे खासगीकरणाचे धोरण, आरोग्य विभागात रिक्त पदांचा प्रश्न गंभीरपणे हाताळला जात नाही. त्यामुळे १७ लाख कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.

इतर प्रमुख मागण्या

- अनुकंपा तत्त्वावर पदे विनाशर्त भरावीत

- आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरित भरावीत

- चतुर्थश्रेणी शिक्षकांची रिक्त पदे भरावीत

- निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करावी

- नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

- शासकीय विभागात कंत्राटीकरण रद्द करा

- शिक्षक-शिक्षकेतरांचे सेवांतर्गत प्रश्न सोडवा

Pensioners protesting at the Eidgah Maidan for 'My Family-My Pension' and various demands by the Central Union of State Government Employees on Wednesday.
Nashik Water Cut: दिवाळीच्या सुरवातीलाचं शहरात ‘पाणीबाणी’; गंगापूर धरण थेट जलवाहिनीला गळती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com