Citylinc Bus  esakal
नाशिक

Nashik Citylinc Bus : सिटीलिंक वाहकांचा संप अखेर मागे; जानेवारीचे वेतन जमा

Citylinc Bus : शहर बससेवेचा अर्थात सिटीलिंक सेवेचा ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देत नसल्यचा आरोप करीत गुरुवारी (ता.२९) पहाटेपासून वाहकांनी पुकारलेला संप शुक्रवारी (ता.१) मागे घेण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Bus : नाशिक महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेली शहर बससेवेचा अर्थात सिटीलिंक सेवेचा ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देत नसल्यचा आरोप करीत गुरुवारी (ता.२९) पहाटेपासून वाहकांनी पुकारलेला संप शुक्रवारी (ता.१) मागे घेण्यात आला. जानेवारी महिन्याचे वेतन वाहकांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून डिसेंबर महिन्याचे वेतन आठ दिवसांत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर वाहकांनी आपला संप मागे घेतला आहे. (Nashik strike of Citylinc marathi news)

नाशिक महानगरपालिकेने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेली महापालिकेची बससेवा सुरू केली. ठेकेदारामार्फत सुरू असलेली सिटीलिंक बससेवा वाहकांचे गेल्या दोन महिन्याचे वेतन थकविले म्हणून गुरुवारी (ता.२९) ठप्प झाली होती.

या आंदोलनात तपोवन डेपोतील सुमारे १५० पेक्षा वाहक सहभागी झाले होते. दोन महिन्यांपासून थकलेले वेतन यासह काही मुद्द्यांवर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. शुक्रवार (ता.१) संपावर असलेल्या वाहकांसमवेत चर्चा करण्यात आली. (latest marathi news)

चौधरी यांची यशस्वी मध्यस्थी

नाशिक शहरातील सिटी लिंक बससेवा वाहकांनी संप पुकारल्याने गुरुवार पहाटेपासून शहरबस सेवा ठप्प झाली होती. वाहक आपल्या मागण्यांवर ठाम होते. बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तसेच यामुळे चाकरमान्यांचे हाल होत होते.

बससेवा पूर्ववत होण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्यामुळे संप मिटला व नाशिक शहरातील तपोवन डेपोतून शहराच्या वेगवेगळ्या मार्गावर बसेस मार्गस्थ झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT