Teacher esakal
नाशिक

Nashik Teacher Recruitment : जिल्ह्यात शिक्षकांच्या 1100 जागा रिक्त; बिगरआदिवासी तालुक्यांना मिळणार दिलासा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Teacher Vacancy : राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील रिक्त जागांचा आकृतिबंध तयार करण्याचे काम जोमाने सुरू झाले आहे.

१५ तालुक्यांकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात सुमारे एक हजार १०० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षक भरतीतून बिगरआदिवासी तालुक्यांमधील शिक्षकांचा प्रश्न सुटणार आहे. (Nashik Teacher Recruitment 1100 vacancies of teachers in district news)

जिल्ह्यात ११ हजार २५२ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. परंतु अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही आणि या काळात सेवानिवृत्तीमुळे शिक्षकांच्या बहुतांश जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यातील शिक्षक भरतीवरील बंदी ३ जुलैला उठल्याने पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात खासगी शिक्षण संस्थांमधील २० हजार पदे भरण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच सांगितले. शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू झाल्यामुळे जिल्ह्यात किती शिक्षकांची आवश्यकता आहे, यादृष्टीने प्राथमिक शिक्षण विभागाने आकृतिबंध तयार करण्यास प्रारंभ केला आहे.

प्रत्येक तालुक्यातून मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षकांची एकूण मंजूर पदे किती व ३ जुलैपर्यंत त्यापैकी किती शिक्षक निवृत्त झाले, किती शिक्षकांची बदली झाली याची माहिती मागविली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या माहितीच्या आधारे साधारणतः दहा टक्के जागा रिक्त असल्याचे दिसते.

एक हजार १०० हा आकडा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी दिसत असला तरी, ‘पेसा’ कायद्यानुसार आदिवासी भागातील (अवघड क्षेत्रातील) शाळांमधील शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवता येत नाहीत. परिणामी, बिगरआदिवासी (सोप्या क्षेत्रातील) भागातील शाळांमध्ये वर्षानुवर्षे शिक्षकांची पदे रिक्त राहतात.

भरतीत ‘अवघड’ क्षेत्राला प्राधान्य

शिक्षक भरती झाल्यानंतर प्रथमतः आदिवासी भागातील (अवघड क्षेत्रात) जागा भरल्या जातील. त्यानंतर उर्वरित शिक्षकांकडून पसंतीक्रमानुसार शाळा दिल्या जातील. शिक्षक भरतीनंतर जिल्ह्यातील एकही शाळा शिक्षकांविना राहणार नाही, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT