Funding esakal
नाशिक

Nashik News : वृद्ध कलावंत, साहित्यिक मानधन योजनेसाठी 20 पर्यंत मुदत

Nashik : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राजर्षी शाहू वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन योजना उपलब्‍ध आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राजर्षी शाहू वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन योजना उपलब्‍ध आहे. या योजनेंतर्गत वृद्ध कलावंत व साहित्यिक यांना दर महिला अ, ब व क श्रेणीसाठी मानधन दिले जाते. योजनेच्‍या लाभासाठी येत्‍या २० मार्चपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविली जात होती. (Nashik Upto 20 terms for senior artists literary gratuity scheme marathi news)

सद्यःस्थितीत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे या योजनेअंतर्गत असलेल्या लाभार्थींची संपूर्ण माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे लाभार्थींनी लाभासाठी आवश्यक असलेली माहिती पंचायत समितीत नियुक्त केलेल्या समन्वय अधिकाऱ्यांकडे २० मार्चपर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. (latest marathi news)

योजनेअंतर्गत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून शंभर कलाकार व साहित्यिकांची निवड जिल्हा स्तरावरील निवड समितीमार्फत करण्यात येते. लाभार्थींची वैयक्तिक माहिती यात आधार कार्ड, संपर्क क्रमांक, कलेचा प्रकार तसेच वृद्ध कलावंतांनी, कलाकार यांच्या वारसांचे नाव, पत्ता, मानधन कधीपासून मिळते याचा तपशील, कलाकार/ वारसदार यांचे वय, आधार क्रमांक, संपर्क क्रमांक, बँक खाते तपशील आदी माहिती कलाकार, वारसदार यांच्या एकत्र छायाचित्रासह विहित मुदतीत सादर करावयाची आहे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT