Nashik News : मालेगावातील भुयारी गटार, पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

Nashik : केंद्र शासन व राज्य शासनपुरस्कृत अमृत-२ अभियानांतर्गत महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजनेच्या कामांचे कार्यादेश अखेर मंगळवारी (ता. १२) देण्यात आले.
nmc
nmcesakal

Nashik News : केंद्र शासन व राज्य शासनपुरस्कृत अमृत-२ अभियानांतर्गत महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजनेच्या कामांचे कार्यादेश अखेर मंगळवारी (ता. १२) देण्यात आले. त्यामुळे लवकरच या योजनांना गती मिळणार आहे. ()

भुयारी गटार योजनेसाठी अंकिता कंन्स्ट्रक्शन, निकोल अहमदाबाद (गुजरात) या संस्थेची वाटाघाटी अंतर्गत मुळ प्राकलन दरापेक्षा ८.७५ टक्के जादा दराची म्हणजे ४९९ कोटी, तर तळवाडे ते मालेगाव थेट जलवाहिनीसह पाणीपुरवठा योजनेसाठी मे. आर ॲण्ड बी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड मुंबई यांची ९.९० टक्के जादा दराची १४६ कोटीची निविदा मंजूर करण्यात आल्याची माहिती आयुक्त रवींद्र जाधव, शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी दिली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या योजनांचे आज (ता.१४) भूमिपूजन होणार आहे.

भुयारी गटार योजनेच्या प्रकल्पास केंद्रीय व राज्यस्तरीय समितीने मान्यता दिली होती. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने दोन्ही विभागांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली. भुयारी गटार योजनेसाठी १४ ऑगस्टपर्यंत चार निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी मे. बी. एल. जी. कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस प्रा.लि. जोधपूर व मे. मानवसेवा कंन्सलटन्ट धुळे यांच्यासोबत संयुक्त उपक्रम करार तपासणीनंतर दोन निविदाधारक पात्र ठरले. (latest marathi news)

nmc
Nashik News : इटलीच्या दांपत्याचे दत्तक विधान पूर्ण! आधाराश्रमातील चिमुरडीला मिळाले हक्काचे घर अन पालकही

यात इन्डो इंजिनिअरींग प्रोजक्ट नागपूर यांची २२ टक्के जादा दराची निविदा होती. तीनवेळा वाटाघाटी करुनही त्यांनी दर कमी करण्यास नकार दिला. तिसऱ्या निविदेत दोन निविदाधारकांपैकी सर्वात कमी दराची निविदा अंकिता कंन्स्ट्रक्शन, निकोल अहमदाबाद यांनी सादर केल्यामुळे या संस्थेला कार्यादेश प्रदान करण्यात आला.

कमी दराच्या निविदेला मंजुरी

अमृत-२ योजनेंतर्गत मालेगाव महानगरपालिकेच्या मंजूर पाणीपुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे. बी. एल. जी. कंस्ट्रक्शन सर्विसेस प्रा.लि. जोधपूर, मे. मानवसेवा कन्सल्टंट धुळे यांनी निविदा तयार केली. या कामासाठी १५ जानेवारी अखेर तीन निविदा प्राप्त झाल्या. पात्र तीन निविदाधारकांपैकी सर्वात कमी दराची मे. आर ॲण्ड बी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड मुंबई यांची १८.५४ टक्के जादा दराची निविदा होती. वाटाघाटीअंती ९.९० टक्के जादा दराने काम करण्याचे पत्र संस्थेने मनपास दिले. त्यानंतर ही निविदा मंजूर करण्यात आली.

योजना ठरणार फलदायी

शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामात तळवाडे ते मालेगाव थेट जलवाहिनी, अविकसीत व जलवाहिनी नसलेल्या भागात जलवाहिनी टाकणे, पाच उंच जलकुंभ, तसेच ३८ एमएलडी जलशुध्दीकरण केंद्रातील सम्पचे काम आदी कामांचा समावेश आहे. या दोन महत्वाकांक्षी योजना ६४५ कोटी खर्चाच्या असून, शहरासाठी त्या फलदायी ठरणार आहेत.

nmc
Nashik News : बागलाण, मालेगावच्या पर्यटनाला मिळणार चालना : खासदार भामरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com