Winter Weather Update esakal
नाशिक

Nashik Weather Update : पारा वाढला अन्‌ थंडी घटली; तापमान 12.6 अंश सेल्‍सीअसवर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कधी कडाक्‍याची थंडी.. तर अचानक गायब होणारी थंडी. अशा वातावरणीय बदलाचा अजब प्रकार नाशिककर सध्या अनुभवत आहेत. शनिवारी (ता.१०) नाशिकचे किमान तापमान १०.४ अंशापर्यंत खालावले असताना, रविवारी (ता.११) तब्‍बल दोन अंशांहून अधिक वाढ होत किमान तापमान १२.६ अंश सेल्‍सीअस नोंदविले आहे.

नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या मध्यात कडाक्‍याची थंडी जाणवल्‍यानंतर गेल्‍या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झालेली होती.

गेल्‍या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा जोर पुन्‍हा वाढलेला असताना, नाशिकचे किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअसपर्यंत खालावले होते. जिल्ह्यातील काही भागांमध्ये तर किमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत खालावले होते. (Nashik Weather Update Mercury rise and cold feel Temperature at 12.6 degrees Celsius Nashik News)

त्‍यातच रविवारी पुन्‍हा वातावरणातून थंडी गायब झाल्‍याची अनुभूती नाशिककरांना अनुभवायला मिळाली. रविवारी नाशिकच्‍या किमान तापमानात दोन अंशाने वाढ होऊन १२.६ अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे.

तर कमाल तापमानाने पुन्‍हा तीस अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, नाशिकचे कमाल तापमान ३०.३ अंश सेल्‍सीअस नोंदविले गेले आहे. कमाल तापमानातही साधारणतः दोन अंश सेल्सिअसची वाढ अवघ्या एका दिवसांत नोंदविली गेली आहे.

ढगाळ वातावरणाचा परिणाम

काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती. रविवारी पुन्‍हा शहरातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. यामुळे वातावरणातील गारठा घटल्‍याचा अनुभव नाशिककरांनी घेतला.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

नाशिकच्या तापमानाची स्‍थिती अशी-

(अंश सेल्सिअसमध्ये)

दिनांक किमान कमाल

६ डिसेंबर १८.८ ३०.७

७ डिसेंबर १६.०० ३०.९

८ डिसेंबर १४.८ २८.२

९ डिसेंबर १०.० २७.४

१० डिसेंबर १०.४ २८.६

११ डिसेंबर १२.६ ३०.३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT