Latest Marathi News | राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत नाशिक उपविजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kho-Kho Compition

Nashik Sports News : राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत नाशिक उपविजयी

नाशिक : काल संध्याकाळी झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात गत विजेत्या उस्मानाबाद संघाने आपले विजेतेपद कायम राखताना नाशिकचा दहा विरूध्द नऊ असा एक गुण आणि सहा मिनिटे राखुन पराभव केला.

सामन्याच्या मध्यांतराला सात विरूध्द तीन अशी निर्णायक आघाडी उस्मानाबाद संघाकडे होती. नाशिक कडून खेळताना दिदी ठाकरे दोन्ही डावात मिळून पाच गडी आणि एक मिनिट वीस सेकंद, सोनाली पवार एक वीस, सरीता दिवा एक मिनिट पंधरा सेकंद, ऋतुजा सहारे एक मिनिट पंधरा सेकंद, सुषमा चौधरी दोन गडी, मनिषा पडेर एक मिनिट आणि एक गडी यांची चांगली खेळी आपल्या संघाचा पराभव टाळू शकली नाही. (Nashik Sub Wins State Championship kho kho tournament Nashik Sports News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Nashik News : मनमाड परिसरात शेकोट्या पेटल्या; थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाय

अखेर गत वर्षा प्रमाणे याही वर्षी नाशिकच्या मुलींच्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली, खजिनदार सुनील गायकवाड आणि सर्व पदाधिकारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

हेही वाचा: Nashik Crime News : दागिने बनविण्याच्या बहाण्याने सव्वादोन लाखाचे दागिने लंपास