YCMOU nashik esakal
नाशिक

Nashik YCMOU News : ‘मुक्‍त’च्‍या एमबीए, बीसीएची सीईटी अर्जाची 13 पर्यंत मुदत

Nashik News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता विविध अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता विविध अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत एमबीए या पदव्‍युत्तर पदवी, तसेच बीसीए या पदवी स्‍तरावरील अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्षाच्‍या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीच्‍या नोंदणीला सुरवात झाली आहे. (Yashwantrao Chavan Maharashtra Open University MBA BCA CET application deadline till 13)

१३ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करून परीक्षेला सामोरे जाण्याची संधी उपलब्‍ध होईल. या अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षा नोंदणीची प्रक्रिया सोमवार (ता. १)पासून सुरू झाली आहे. मुक्‍त विद्यापीठात या शिक्षणक्रमांना प्रवेश घेऊ इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, असे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे.

ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. इच्‍छुक व पात्रताधारक विद्यार्थ्यांनी परीक्षेच्‍या नोंदणसाठी https://ycmapp.ycmou.org.in/login या लिंकवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे, असे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन आपले प्रवेश निश्‍चित करावेत, असे आवाहन परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे. (latest marathi news)

प्रवेश परीक्षेसाठी सूचना

एमबीएसाठी प्रवेश परीक्षा शुल्‍क सहाशे रुपये, तर बीसीएसाठीचे शुल्‍क पाचशे रुपये आहे. दोन्‍ही अभ्यासक्रमांच्‍या माहितीपुस्‍तिका संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. प्रवेश परीक्षेची नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना सराव परीक्षा (डेमो/मॉक टेस्‍ट) उपलब्ध करून दिली जाईल.

त्यानंतर प्रवेश परीक्षा देता येईल. परीक्षेसंदर्भात तांत्रिक अडचण उद्‌भवल्‍यास सहाय्यता क्रमांकावर संपर्क साधता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT