Water filter lying in the headquarters of Zilla Parishad esakal
नाशिक

Nashik News: ZP मुख्यालयात पाणी मिळणार का? पाणी पिण्यासाठी 6 वॉटर फिल्टर 15 दिवसांपासून पडून

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेतील मुख्यालयात कामासाठी येणाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे वास्तव ‘सकाळ’ ने २२ मेस प्रसिद्ध केले होते. त्यावर, प्रशासनाने तातडीने मुख्यालयात येणाऱ्या सामान्यांसाठी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टर बसविण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार, सहा वॉटर फिल्टर खरेदी केले गेले. परंतु, महिनाभरापासून हे वॉटर फिल्टर मुख्यालयातील विविध ठिकाणी पडून आहेत. उन्हाळा संपत आला असून पावसाची चाहूल लागली. मात्र नेमके पिण्याचे पाणी कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (Nashik ZP headquarters 6 water filters for drinking water dumped for 15 days news)

जिल्ह्याच्या विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील पिण्याचे पाण्याचे नियोजन होत असते. परंतु जिल्हा परिषदेतील मुख्यालयातच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागाकडून आलेल्या नागरिकांचे तसेच ठेकेदार, अभ्यागत यांचे हाल होत आहेत.

जिल्हा परिषदेत अधिकारी-कर्मचारी वगळता दररोज येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या आवारात कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी सामान्यांचे हाल होतात.

हे वास्तव निर्दशनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने लागलीच मुख्यालयात पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. त्यानुसार बांधकाम विभागाकडून देखभाल दुरुस्ती अंतर्गत सहा वॉटर फिल्टर खरेदी केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रत्येकी ३४ हजारांचे असलेले हे वॉटर फिल्टर आरोग्य, कृषी, रावसाहेब थोरात सभागृहाबाहेर, लेखा व वित्त विभाग, बांधकाम विभाग तसेच, शिक्षण या सहा विभागाबाहेरील परिसरात बसविले जाणार आहे. सदर वॉटर फिल्टर खरेदी होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, अद्याप हे वॉटर फिल्टर बसविण्यात आलेले नाही.

"मुख्यालयातील सहा ठिकाणी हे वॉटर फिल्टर बसविले जाणार आहे. वॉटर फिल्टरसाठी लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हे वॉटर फिल्टर बसविले जातील. लवकरच अभ्यागताना पिण्याचे पाणी मिळेल."

- संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, जि. प. बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT