teacher esakal
नाशिक

शिक्षकांच्या बदलीसाठी लवकरच नवी संगणकप्रणाली

विजय पगार

इगतपुरी (जि.नाशिक) : जिल्हा परिषद शिक्षकांच्या (Zilla Parishad teachers) आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत ऑनलाइन बदल्यांसाठी नव्याने सॉफ्टवेअर (new software) तयार करण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. (New-computer-system-for-teacher-replacement-soon-nashik-marathi-news)

शासनाने दिल्या सूचना

या संगणकीय प्रक्रियेसाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करून राज्य शासनाकडे पाठवावे. शिक्षकांचे आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी निविदा प्रक्रिया राबविणे. त्यासाठी सातारा जिल्हा परिषद, महाआयटी, एनआयसी, सी-डॅक या संस्थांची मदत घ्यावी. सॉफ्टवेअर तयार केल्यानंतर त्याची चाचणी करून प्रत्यक्षात वापर करावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. सचिव तथा राज्य समन्वयक म्हणून सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची नेमणूक केली. ही समिती पाच जणांची असून, अध्यक्ष आणि सचिवांसह तीन सदस्य चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि वर्ध्याचे सचिन ओंबासे सदस्य आहेत.

बदली प्रक्रियेत पारदर्शकता, सुरक्षितता आणण्यासाठी विशेष प्रयत्न

शिक्षकांच्या बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी महिनाभराची मुदत आहे. बदलीत ‘पारदर्शकता’ आणि ‘सुरक्षितता’ या दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे सॉफ्टवेअर तयार करताना लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी शॉर्ट टेंडर काढण्यात येणार असून, सर्व बाबींचा विचार करून समितीकडे सॉफ्टवेअर तयार करण्यात येईल. त्यानंतर तत्काळ शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Assembly : आमदार पत्नी मुख्यमंत्र्यांना विकासाच्या मुद्द्यावर सभागृहातच नडली, विधानसभेत पाहायला मिळाले अचंबित करणारे दृश्य

पाय घसरला आणि.., पडता पडता थोडक्यात वाचली जेनिलिया, सोशल मीडियावर Viral Video

VIDEO : अवघ्या २४ तासांत भयंकर चक्रीवादळ! हिंदी महासागरात होरासियो Category 5 वादळ, होणार गंभीर परिणाम, डोळे फिरवणारा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Traffic Fine: गाडी पुण्यात, चालान नागपुरात; वाहतूक पोलिस विभागाचा अजब कारभार

Vinayak Damodar Savarkar Atmaarpan Day 26 Februar : तुजसाठी मरण ते जनन...; स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिन!

SCROLL FOR NEXT