Nashik Unlock : दुपारनंतर द्यावा लागणार पुरावा अन्‌ ओळखपत्र

nashik unlock
nashik unlockesakal

नाशिक : लॉकडाउनचे निर्बंध (lockdown) शिथिल झाल्यानंतर दोन दिवसांपासून रस्त्यावर वाढलेल्या गर्दीला नियंत्रणासाठी प्रशासनाने शहर-जिल्ह्यात कोरोना संर्सगाचा (corona virus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात दुपारी जमावबंदी आदेश लागू केला आहे. वाचा सविस्तर (afteroon-curfew-imposed-in-district-nashik-marathi-news)

दुपारी जमावबंदी आदेश लागू

लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन दिवसांपासून रस्त्यावर वाढलेल्या गर्दीला नियंत्रणासाठी प्रशासनाने शहर-जिल्ह्यात कोरोना संर्सगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात १५ जूनपर्यंत दुपारी तीन ते सकाळी सहापर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे दुपारी तीननंतर सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. आवश्यक कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना ओळखपत्र व सबळ पुरावे सोबत ठेवावे लागणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी १५ जून सकाळी सातपर्यंत नाशिक जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. प्रतिबंधात्मक उपायोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात १५ जूनपर्यंत नागरिकांना दुपारी तीन ते सकाळी सहापर्यंत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई असेल. अत्यावश्यक कारणासाठी व्यक्तींना बाहेर पडताना फोटो ओळखपत्र तसेच बाहेर पडण्याचे कारण स्पष्ट करण्यासाठी सबळ पुरावादर्शक कागदपत्रे जवळ बाळगावी लागणार आहेत. सार्वजनिक, खासगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने नागरिकांना परवानगी दिलेल्या कामासाठी वापरता येतील.

nashik unlock
कोविड रुग्णसेवा अखंडितपणे सुरू ठेवणार; हॉस्पिटल ओनर असोसिएशन
nashik unlock
VIDEO : रुग्‍णालयांच्‍या समस्‍या शासनाने समजून घ्याव्‍यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com