death esakal
नाशिक

Nashik News: NMC सफाई कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंचवटीतील रामवाडीमध्ये महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. कौटुंबिक कारण व तणावातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येते आहे. (NMC cleaning worker commits suicide by hanging himself Nashik News)

योगेश विजय गोहिल (३१, रा. श्रद्धा पार्कजवळ, रामवाडी, पंचवटी) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. योगेश यांनी शनिवारी (ता. २४) दुपारी साडेतीन ते चारपूर्वी राहत्या घरात मफलरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपविले.

घटनेची माहिती समजताच पंचवटी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक डी. पी. खैरनार, पोलिसनाईक बाविस्कर घटनास्थळी दाखल झाले.

योगेशच्या मित्रांनी व कुटुंबाने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पंचवटी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, योगेश सध्या आरटीओ भागात सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त होता. त्याच्या मागे मनपातून मुकादम पदावरून निवृत्त झालेले वडील विजय, आई, तीन बहिणी असा परिवार आहे.

दरम्यान, कौटुंबिक समस्या व तणावातून योगेश मद्याच्या आहारी गेला होता. नशेतच त्याने गळफास घेतल्याचे घटनास्थळावरील पाहणीवरून दिसते. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT