Nashik Crime News : खळबळजनक! सातपूरमध्ये परप्रांतीय महिलेचा खून

Police Investigation Of Murder
Police Investigation Of Murderesakal

Nashik News : नाशिक मध्ये गुन्हेगारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. आज दिनांक 26 जुन रोजी दुपारच्या सुमारास सातपूर मध्ये परप्रांतीयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(Murder of foreigners in Satpur Nashik Crime News)

विधाते गल्ली येथे राहत्या घरात महिलेचा गळा कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही ‘आत्महत्या आहे की हत्या’ याबाबत स्पष्टता झालेली नसून पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अशोक्तीबाई सनीदयाल बैगा (वय २९) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला मूळ मध्य प्रदेशची आहे. तिचा पती सनीदयाल रामजीवनमल बैगा यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनीदयाल हा सातपूर औद्योगिक वसाहतीतील जेबीएम या खासगी कंपनीत कामाला आहे. एक मुलगा व एक मुलगी, असे अपत्य या बैगा कुटुंबाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police Investigation Of Murder
Nashik News : शहरात Triple Seat स्वार सुसाट; वाहतूक शाखेचा अघोषित परवाना?

या घटनेनंतर पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. ही हत्या नेमकी कशासाठी करण्यात आली, याचा शोध पोलिस घेत आहेत.

गेल्या तीन दिवसांपूर्वी बेग विधाते गल्लीतील सुमन रघुनाथ नाटे यांच्या जुन्या घरी भाड्याने राहायला आलेल्या होत्या. घटनास्थळी पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, गुन्हे शाखेचे विजय ढमाळ यांच्यासह गुप्त विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी पोलिसांच्या मार्फत सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचे काम चालू होते.

वीस वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती

वीस वर्षांपूर्वी याच घरात एकाचा खून झाला होता. नेपाळी व्यक्तीने तो खून केल्याच समोर आले होते. त्यानंतर वीस वर्षांनंतर परत त्याच घरात ही दुसरी घटना समोर आली आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच ही महिला मध्य प्रदेशवरून सातपूरच्या विधाते गल्लीत राहायला आली होती. अजून तिची स्थानिक नागरिकांशी ओळख होण्याआधीच मृत्यू झाल्याने विविध प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

Police Investigation Of Murder
Nashik News: शिक्षकसह भरतीचे अधिकार शिक्षणसंस्था चालकांना द्या : मुंबईतील बैठकीत मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com