NMC Nashik esakal
नाशिक

NMCने शहरातील साडेचार हजार खड्डे भरले

विक्रांत मते

नाशिक : पावसाच्या संततधारेमुळे रस्त्यांची चाळण झाल्याने डागडुजीला महापालिकेच्या बांधकाम विभागाने सुरवात केली आहे. जवळपास सहा हजार खड्डे शहरातील मुख्य रस्त्यांवर पडल्याचे सर्वेक्षणातून समोर आले होते. यातील जवळपास साडेचार हजार खड्डे भरण्यात आले असून, त्यासाठी मुरूम, पेपर ब्लॉक तसेच शक्य असेल त्या ठिकाणी डांबराच्या सहाय्याने खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. (NMC filled 4500 potholes in city Nashik Latest Marathi News)

गेल्या दोन वर्षांत महापालिकेने रस्त्यांवर जवळपास साडेसहाशे कोटी रुपयांचा खर्च केला, मात्र पावसामुळे हा खर्च वाया गेल्याचे चित्र दिसत आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरचा पहिला थर निखळून पडला आहे. अधिक वाहतूक असलेल्या भागांमध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे लक्षात येत नाही, अशी परिस्थिती आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने अद्यापही उघडीप दिलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या खड्ड्यांचे पितळ उघडे पडले आहे. नागरिकांच्या रोशामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. जवळपास सहा हजारांपैकी साडेचार हजार खड्डे भरण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

महापालिकेने रस्त्यांचे सर्वेक्षण केले, त्यात जवळपास सहा हजार खड्डे आढळून आले. हे खड्डे पेपर ब्लॉक तसेच मुरूम व अन्य साहित्याने भरले जात आहेत. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदारांवर आहे. जे ठेकेदार कामात कसूर करतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT