artists making ganesh idol latest marathi news esakal
नाशिक

Nashik : गणेशमूर्ती कारागिरांना महापालिकेकडून नोटीस

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना (ganesh idol makers) तसेच कारखानदारांना महापालिकेकडून (NMC) नोटीस बजावण्यात आली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसने (POP) प्रदूषण होत असल्याने कुणीही त्यापासून मूर्ती तयार करू नये. अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या. (NMC issues notice to Ganeshmurti artisans Nashik Latest Marathi News)

गणेशोत्सवास ३१ ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. त्यानिमित्ताने गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखानदारी मोठ्या प्रमाणावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या तयार करून ठेवल्या आहेत. जिल्हाभराच्या कारागिरांकडून सुमारे दहा लाख मूर्ती तयार केल्याचे संघटनेच्या अध्यक्षकडून सांगण्यात आले.

त्यानंतर आता महापालिकेकडून ‘पीओसी’ मूर्ती तयार करू नये. अशा प्रकारच्या मूर्ती आढळल्यास कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तयार मूर्ती विक्रीस परवानगी मिळणार की नाही, अशी भीती कारखानदार, विक्रेते तसेच कारागिरांकडून व्यक्त केली जात आहे.

असे झाल्यास प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या संदर्भात गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदार कारागिरांच्या संघटनेतर्फे नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाकडून निर्णय आल्यास त्याचे पालन केले जाईल.

तोपर्यंत महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये. शिवाय अन्य शहराच्या महापालिकेकडून ३१ ऑगस्ट पर्यंत २०२२ पर्यंत अशा मूर्ती विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेनेही परवानगी देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

"प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत नाही. याचे वैज्ञानिक पुरावे देण्यात आले आहे. तरीदेखील नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. नोटीस द्यायचीच होती, तर मुर्त्या तयार होण्यापूर्वी अर्थात दिवाळीनंतर लगेचच दिली असती. त्यामुळे नुकसान टळले असते. न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत परवानगी देण्यात यावी." - संजय सोनार, अध्यक्ष, गणेशमूर्ती कारागीर संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT