NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: ध्वज निधी संकलनात महापालिका प्रथम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्रातील सैनिकांचे कल्याण व पुनर्वसन, शहीद सैनिक कुटुंबीयांना मदत करण्यासाठी निधी संकलित केला जातो. त्यात नाशिक महापालिकेकडून जिल्ह्यात सर्वाधिक १० लाख ८ हजार रुपये सशस्त्र सेना ध्वजदिनी निधी संकलित केला.

त्याबद्दल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार केला. आयुक्त करंजकर यांचा सन्मान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. (NMC News Municipal first in flag fund collection nashik)

महापालिकेच्या लेखा विभागाचे उपलेखापाल रमेश उदावंत व सूर्यभान खोडे यांनी प्रमाणपत्र स्वीकारले. २०२३-२४ च्या ध्वज निधी संकलनाची सुरवात देखील या कार्यक्रमात करण्यात आली.

या निधी संकलनात मुख्य वित्त व लेखा अधिकारी सुरेखा जाधव, उपलेखा अधिकारी गुलाब गावित यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगर पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचा मोठा सहभाग असल्याचे अतिरिक्त आयुक्त चौधरी यांनी सांगितले.

या वेळी उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, नितीन नेर, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, लेखा विभागातील उपलेखापाल रमेश उदावंत, लेखापाल दत्तात्रेय पुंड, अजय कमोद आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT