thief esakal
नाशिक

Diwali Precaution: दिवाळी सुटीवर जाताय, ‘एक अर्ज चौकीला’ द्या! पोलिसांचा अभिनव उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Diwali Precaution : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्या, घरफोड्या व वाहन चोरीमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीची सुटी असल्याने लक्ष्मीपूजनानंतर बहुतांश नागरिक चार-आठ दिवसांसाठी आपापल्या गावी वा सहलीनिमित्त परगावी जातात.

त्यामुळे गावी जाणाऱ्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंच्या वा वाहनांच्या सुरक्षिततेची उपाययोजनांच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. दरम्यान यंदा शहर पोलिसांनी ‘एक अर्ज चौकीला’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. (one application to police station initiative by police nashik news)

दिवाळी वा सुटीत सहलीनिमित्त बाहेरगावी जात असाल तर त्यासंदर्भात नागरिकांनी आपल्या हद्दीतील पोलिस चौकीकडे एक अर्ज द्यावा. जेणेकरून पोलिस गस्ती पथकाकडून त्या परिसरात गस्त राहील. ‘एक अर्ज चौकीला’ हा अभिनव उपक्रम नाशिक शहर पोलिसांकडून यंदाच्या दिवाळीत राबविला जाणार आहे. ज्यामुळे त्या-त्या परिसरात गस्तीतून पोलिसांना लक्ष ठेवता येऊ शकेल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दिवाळीनिमित्त शाळांसह औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनाही आठवडाभराच्या सुटी असते. बहुतांशी नागरिक लक्ष्मीपूजनानंतर आपापल्या गावी वा सहलीनिमित्त दोन-चार दिवसांसाठी परगावी जातात.गेल्या काही दिवसांमध्ये शहरात चोऱ्या-घरफोड्यांसह चारचाकी-दुचाकी वाहने चोरट्याच्या टार्गेटवर आहे. तर बंद घर-फ्लॅट दिसताच ते फोडण्याचे प्रकार भरदिवसा होऊ लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिस ठाणेनिहाय गस्ती पथकांची संख्या वाढवून सातत्याने दिवसरात्र गस्त घातली जाणार आहे.

नागरिकांनी परगावी जाताना मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बँकेत लॉकरमध्ये ठेवावेत, वाहनांची सुरक्षितता तपासून घ्यावी, बहुमजली इमारत असल्यास सुरक्षारक्षकाला सजग राहण्यास सांगावे, अनोळखी व्यक्तींना इमारतीमध्ये प्रवेश नाकारावा, शेजारी राहणाऱ्यांना सजग राहण्यास सांगावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

चोरट्यांकडून बंद घरांची रेकी करून चोऱ्या-घरफोड्या केल्या जात आहेत. परिसरामध्ये दिवसरात्र पोलिस गस्ती पथके असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरीही चोऱ्या-घरफोड्या, जबरी चोऱ्यांच्या घटना घडत असल्याने पोलिस गस्तीचा दावा फोल ठरत असल्याचे दिसून आले आहे.

चांगला उपक्रम गुंडाळला

पोलिस आयुक्तालयाने काही वर्षांपूर्वी ‘खरा पहारेकरी सख्खा शेजारी’ हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन आपसांत सलोख्याचे संबंधही निर्माण झाली होती. परंतु ‘नवा अधिकारी, नवा राज’ या उक्तीप्रमाणे सदर उपक्रमही गुंडाळला गेला आहे. त्यामुळेच चोऱ्या-घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याची पोलिस वर्तुळातच चर्चा आहे.

"दिवाळी सुट्टीत परगावी जाण्यापूर्वी नागरिकांनीही मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवावेत. तसेच, आपल्या शेजाऱ्यांना अवगत करून जावे. कॉलनी वा इमारतींमध्ये अनोळखी व्यक्ती दिसल्यास तत्काळ स्थानिक पोलिस ठाण्याला कळवावे." - प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT