While giving a statement to Arun Sia, Adv. Konika Jadhav, Jyoti Pardeshi etc.  esakal
नाशिक

Nashik News: बसथांबा स्वच्छतागृह ठेकेदाराकडून बेकायदेशीर वसुली; ‘महिलांसाठी मोफत’ फलक लावण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बसथांबा येथील स्वच्छतागृह ही नियमाप्रमाणे महिलांसाठी मोफत असताना ठेकेदार अवैध व बेकायदेशीर वसुली करत असल्याने महिला सामाजिक कार्यकर्त्यानी विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली असून, याबाबत सिया यांनी तातडीने याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (Order to put up free for women board at bus stand toilet nashik news)

तातडीने या ठिकाणी ‘महिलांसाठी मोफत’ असे फलक लावण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. नाशिक विभागातील सीबीएस, महामार्ग बस डेपो, मेळास्थानक या गर्दीच्या ठिकाणासह ३५ ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृह जी नियमाप्रमाणे महिलांसाठी मोफत असायला हवी. परंतु ठेकेदार हे जबरदस्तीने व बेकायदेशीर पद्धतीने महिलांकडून ५ रुपये व त्यापेक्षा जास्त रक्कम वसूल करतात.

हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कोनिका जाधव- टिळे आणि छावा जनक्रांती संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ज्योती परदेशी यांच्या लक्षात आली.

त्यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे आणि मनसे राजगड कार्यालयात निवेदन देत ही बाब लक्षात आणून दिली. मनसे प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे यांनीदेखील फोनद्वारे सिया यांना संपर्क केला असता सदर प्रकार हा गंभीर असून बेकायदेशीर आहे व त्यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

सिया यांनी सदर प्रकारात पत्र काढून स्वच्छतागृहाबाहेर महिलांसाठी मोफत असे फलक दर्शनी भागात लावू, असे आश्वासन दिले. विनया नागरे, तनुजा रूपवते, ज्योती परदेशी आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Pakistan Match Fixing : पाकिस्तानी फिक्सर, इंग्लंड दौऱ्यावर संशयास्पद घडामोडी! फोन जप्त, PCB कडून चौकशी; खूप मोठी नावं अडकणार?

SCROLL FOR NEXT