nashik ozar airport
nashik ozar airport esakal
नाशिक

ओझर विमानतळाला ‘हज टर्मिनल’चा दर्जा

युनूस शेख

जुने नाशिक : ओझर विमानतळाला हज टर्मिनलचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या हज टर्मिनलच्या यादीत ओझर विमानतळाचेही नाव असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.

या यादीत ओझरचा समावेश व्हावा यासाठी खासदार गोडसे यांचा काही महिन्यांपासून केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. त्यात त्यांना यश आले. या दर्जासाठी राज्य सरकारची शिफारस आवश्यक असते. त्यामुळे खासदार गोडसे यांनी राज्याच्या अल्पसंख्याक मंत्रालयाकडून केंद्राकडे शिफारस पाठविली होती. ओझरहून हजसाठी उड्डाण सुरू करण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्याचा अहवाल येथील एचएएल प्रशासनाने केंद्राच्या नागरी उड्डाण मंत्रालयास शनिवारी (ता. ३०) पाठविला. त्यामुळे आता लवकरच येथून हजसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातून दर वर्षी १२ ते १५ हजार मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जात असतात. यासाठीची प्रक्रिया राज्य शासनाने जरी ऑनलाइन केली असली, तरी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भाविकांना मुंबई येथे तीन ते चार वेळा जावे लागते. त्यानंतर मुंबई विमानतळावरून हज यात्रेसाठी रवाना व्हावे लागते. यात पैसे आणि वेळ खर्ची पडतो.

कोट्यानुसार उड्डाण

कोरोनामुळे सौदी सरकारकडून यंदा हज यात्रेचा कोटा कमी करण्यात आला आहे. कोटा वाढल्यास या वर्षापासून, अन्यथा पुढील वर्षापासून ओझर विमानतळावरुन हज यात्रेसाठी विमानव्यवस्था उपलब्ध होणार असल्याचेही श्री. गोडसे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

Pune Car Crash Case: कल्याणीनगर प्रकरणातील आरोपीला निबंध लिहण्याची शिक्षा देऊन जामीन देणारा कोण? सदस्यांची होणार चौकशी

T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल? गावसकर, लारा, हेडनसह दिग्गजांनी काय केली भविष्यवाणी, पाहा Video

Manoj Jarange Patil Biopic : 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर रिलीज ; 'हा' मराठी अभिनेता साकारतोय मनोज जरांगेंची भूमिका

Thane News: बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या आव्हाडवर फौजदार गुन्हा दाखल करा, आनंद परांजपे आक्रमक

SCROLL FOR NEXT