Mechanical Broom esakal
नाशिक

NMC News: लोकप्रतिनिधींना यांत्रिकी झाडू मागण्यास बंदी; नियमावली तयार करणार

सकाळ वृत्तसेवा

NMC News: महापालिकेने इटलीहून खरेदी केलेल्या ३३ कोटींच्या चार यांत्रिकी झाडूंची चाचणी यशस्वी होत असताना नगरसेवक, लोकप्रतिनिधींकडून लग्न समारंभ किंवा वैयक्तिक कामांसाठी घर, कार्यक्रमस्थळी यांत्रिकी झाडूची मागणी लक्षात घेऊन नियमावली तयार केली जाणार असून खासगी कामासाठी महापालिकेची यंत्रणा वापरता येणार नाही.

त्याचबरोबर महापालिका हद्दीबाहेर मंत्री किंवा व्हीआयपींचा दौरा असल्यास तेथे यांत्रिकी झाडूच्या साहाय्याने झाडलोट, स्वच्छता करायची असेल तर किलोमीटर किंवा वेळेनुसार दर आकारले जाणार आहे. (People representatives are prohibited from asking for mechanical broom nashik news)

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून महापालिकेला अनुदान प्राप्त झाले. त्या अनुदानापैकी ३३ कोटींच्या अनुदानातून इटली येथून चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले. एप्रिल २०२३ मध्ये पुरवठादार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले. ऑक्टोबरअखेर यांत्रिकी झाडू शहरात दाखल झाले. प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता झाडू प्रत्यक्षात कार्यरत झाले आहे.

मंगळवारी (ता. ५) रात्रीपासून यंत्रामार्फत रस्ते स्वच्छता करण्यास सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात तीन ते चार दिवस प्रायोगिक तत्त्वावर यांत्रिकी झाडू चालविले जात आहे. यांत्रिकी झाडू खरेदीसाठी प्रत्येकी २ कोटी ६ लाख रुपये असे एकूण १२.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पुढील पाच वर्षासाठी देखभाल दुरुस्ती मनुष्यबळ पुरविणे तसेच इंधन यावर दरमहा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च केले जाणार आहे.

पाच वर्षासाठी एकूण देखभाल व दुरुस्तीसाठी २१ कोटी आठ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. अशोकस्तंभ ते गंगापूर गाव, मुंबई नाका ते अशोकस्तंभ, सीबीएस ते कॅनडा कॉर्नर, कॅनडा कॉर्नर ते भोसला मिलिटरी हायस्कूल गेट, त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव, गडकरी चौक ते तिडके कॉलनी, चांडक सर्कल ते मुंबई नाका, महात्मा गांधी रस्ता ते मेनरोड, नेहरू गार्डन ते शालिमार, पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा या रस्त्यांची स्वच्छता होणार आहे.

एका यांत्रिकी झाडूमार्फत एका बाजून वीस किलोमीटर असे दोन्ही बाजू मिळून दररोज ४० किलोमीटर रस्त्यांची झाडलोट केली जाणार आहे. चार वाहनांच्या माध्यमातून एकूण १६० किलोमीटर रस्ते दररोज स्वच्छ केले जाणार आहे.

मनुष्यबळ वाचणार

यांत्रिकी झाडूंच्या माध्यमातून १६० किलोमीटर रस्त्याची झाडलोट करत असताना मुख्य रस्ते झाडले जाणार आहेत. महापालिकेकडे सध्या २८०० सफाई कर्मचारी व आउट सोर्सिंगचे सातशे कर्मचाऱ्यांमार्फत सफाई होते. एका सफाई कर्मचाऱ्याकडून दोन्ही बाजूने पाचशे मीटर अशी साधारण एक किलोमीटर रस्ते झाडलोट अपेक्षित आहे. यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून सफाई सुरू झाल्यास १६० मनुष्यबळ वाचेल, असा दावा केला जात आहे.

मनुष्यबळ अंतर्गत रस्त्यांची झाडलोट करण्यासाठी वापरले जाणार आहे. यांत्रिकी झाडू खरेदी केला म्हणून लोकप्रतिनिधी, आजी- माजी नगरसेवक अधिकाऱ्यांना फोन करून वाटेल तेथे केव्हाही झाडूची मागणी करतील. त्यातून मुख्य हेतू साधला जाणार नाही. त्यामुळे नियमावली तयार केली जाणार आहे. त्यात नगरसेवक, लोकप्रतिनिधींच्या घरचा व खासगी कार्यक्रमासाठी यांत्रिकी झाडू वापरता येणार नाही.

दोन दिवसात पाच टन माती

यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर ठराविक भागात झाडलोट करण्यात आली. दोन दिवसात ट्रॅक्टरच्या साहाय्याने झाडलोट करताना जवळपास पाच टन माती गोळा झाली आहे.

नियमावलीचे ढोबळमानाने स्वरूप

- शहराच्या हद्दीबाहेर वापर नाही.

- हद्दीबाहेर वापर झाल्यास किलोमीटर किंवा वेळेप्रमाणे पैसे मोजावे लागणार.

- पश्‍चिम व पूर्व विभागासाठी दोन, नाशिक रोड-पंचवटी, सिडको- सातपूर भागासाठी एक यंत्र.

- आजी-माजी नगरसेवकांना खासगी कामासाठी झाडूचा वापर करता येणार नाही.

- यांत्रिकी झाडूमार्फत फक्त मुख्य रस्ते झाडणार.

- अंतर्गत रस्त्यांची झाडलोट मनुष्यबळाच्या माध्यमातून.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT