नाशिक

राणेंविरोधात अटकेचे आदेश कायदेशीरच : नाशिक पोलीस आयुक्त

अरूण मलाणी

नाशिक : नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्र्याबाबत (cm uddhav thackeray) जे वक्तव्य केले. त्यानुसार आम्ही अटकेचे आदेश केले. त्यामध्ये सर्व प्रिव्हिलेज पाळले जाईल. याबाबत आम्ही रत्नागिरी पोलिसांना देखील सांगितले आहे. नारायण राणेंविरोधात अटकेचे आदेश कायदेशीरच असेल असे वक्तव्य नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (nashik police commissioner deepak pandey) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पोलिस आयुक्तांशी कारवाई करण्यासाठी पाठपुरावा

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thaceray) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडचणीत आले आहेत. यासंदर्भात नाशिकमध्ये शिवसेनेचे सुधाकर बडगुजर (ता.२३) यांनी काल रात्री १ वाजता तक्रार दाखल केली होती. त्यामुळे नाशिकचे पोलिस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी कोकणसाठी रवाना झाल्याचा दावा शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आज केला. दरम्यान यासंदर्भात बडगुजर म्हणाले, नाशिकच्या पोलिस आयुक्तांशी यासंदर्भात कारवाई करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत.

नारायण राणेंविरोधात अटकेचे आदेश कायदेशीरच : पोलीस आयुक्त.

राजकारण शासकीय यंत्रणेच्या मध्ये घेता येत नाही. परंतु नारायण राणेंनी जे वक्तव्य केले. त्यानुसार आम्ही अटकेचे आदेश केले. त्यामध्ये सर्व प्रिव्हिलेज पाळले जाईल. याबाबत आम्ही रत्नागिरी पोलिसांना देखील सांगितले आहे. कायदा मोठा आहे. मी पक्ष बघत नाही. तक्रार नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला असून संविधानानुसार मंत्री ही मोठी व्यक्ती आहे. त्यानुसार आम्ही तक्रार दाखल करून घेतली आहे. ज्यांनी दगडफेक केली त्यांना नक्कीच अटक होऊन कारवाई होईल. त्यांनाही कोणत्याही प्रकारे सुटका मिळणार नाही असा विश्वास पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना दिला. दरम्यान भाजपचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते.

तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करा - भाजप आमदार देवयानी फरांदे

-शिवसेना सत्तेचा गैरवापर करत असून त्यांना अटक करा. शिवसेनेचेच लोकं त्यांच्या कार्यालयावर हल्ला करत आहेत. ज्या तत्परतेने तुम्ही गुन्हा नोंदवला त्या तत्परतेने तुम्ही त्यांना अटक करत नाही. हे सर्व संशयास्पद आहे. पोलिसांची भूमिका आणि राज्य शासनाची भूमीका संशयास्पद आहे. त्यामुळे ही घटना घडली आहे. पोलिसांना पुढे करून सेनेने कामे करू नये. तुम्ही गुन्हा नोंदवला म्हणूनच हे झाले आहे. सेनेच्या कार्यालयावर धाड टाका तिथे नक्कीच दगड, काठ्या सापडतील. 24 तासात त्यांना अटक होऊन जर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT