नाशिक पोलिस आयुक्तांकडून राणेंवर कारवाईचे आश्वासन - बडगुजर

sudhakar badgujar
sudhakar badgujaresakal

राणेंना अटक होणारच; नाशिक पोलिस आयुक्तांकडून आम्हाला आश्वासन -बडगुजर

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thaceray) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नाशिकसह आता विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे नाशिकचे पोलिस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी कोकणसाठी रवाना झाल्याचा दावा शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. दरम्यान यासंदर्भात बडगुजर म्हणाले, नाशिकच्या पोलिस आयुक्तांशी यासंदर्भात कारवाई करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. समाजात द्वेष निर्माण करणारे वक्तव्य राणे यांनी केले आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान व्यक्तीबाबत काय बोलावे याचे संकेत देखील राणे यांनी सोडले आहेत. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिले आहे. राणे यांच्यावर कारवाईच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच राणेंच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक कोकणाकडे रवाना झाले आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. नाशिकमध्ये नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांत नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत. समाजामध्ये तेढ, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकतो. त्यानुसार नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यात येऊ शकतो. नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे.. नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली.

राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक नाशिकमध्ये आक्रमक! भाजप कार्यालयाची तोडफोड

केंद्रीय मंत्री नारायण राणेनी (narayan rane) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता असून त्यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलीसांनी दिले आहेत. राणेंच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून आता राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच तापल्याचं दिसत आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक नाशिकमध्ये आक्रमक नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत नाशिकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com