Nashik Latest Crime News esakal
नाशिक

Nashik Crime : खून प्रकरणातील संशयितांच्या मागावर पोलिस दरभंगात

नरेश हाळणोर

नाशिक : अंबड शिवारातील संजीवनगर येथे मंगळवारी (ता. ५) रात्री युवकाच्या गळ्यावर वार करून खून (Murder) केल्याप्रकरणी अद्याप संशयित अटक नाहीत. संशयितांचा शोध घेण्यासाठी अंबड पोलिसांचे पथक बिहारमधील दरभंगाकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Police in Darbhanga on trail of murder suspects Nashik Crime News)

सदरे आलम शब्बीर शेख (१९, रा. दरभंगा, बिहार) या युवकाच्या गळ्यावर वार करून खून झाला. सदरे शेख याच्या गळ्यावर अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने गंभीर वार केला. त्या वेळी बघ्यांची गर्दी झाली, परंतु कोणीही त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल केले नाही. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केले.

परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयत हा परप्रांतीय असल्याने त्याच्यावर हल्ला करणारेही त्याच्याच ओळखीतील असण्याची शक्यता आहे. त्यानुसार, अंबड पोलिसांनी एक पथक तयार करून ते बिहारमधील दरभंगाकडे रवाना केले आहे. तसेच, संजीवनगर परिसरातही पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

"मयत युवक परराज्यातील असून, प्राथमिक तपासात संशयितही परराज्यातीलच असावेत अशी शक्यता आहे. त्यासाठी एक पथक रवाना करण्यात आलेले आहे. लवकरच संशयित पोलिसांच्या ताब्यात येतील." - वसंत मोरे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT