मॉडेल रोडचे बजेट कोलमडले; 800 कोटींच्या रस्ते बजेटवर आयुक्तांची फुली

nmc commissioner ramesh pawar Latest Marathi News
nmc commissioner ramesh pawar Latest Marathi News esakal

नाशिक : शहरात महापालिकेचे (NMC) सहा विभाग आहे. या सहा विभागांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे बारा रोड मॉडेल म्हणून विकसित केले जाणार आहे. या मॉडेल रोडचा नारळ बारदान फाटा ते त्र्यंबक रोड रस्त्यासाठी टीडीआर (TDR) द्वारे भूसंपादन करण्याच्या नोटिशीने फुटला आहे. परंतु, दुसरीकडे बारा रस्ते तयार करण्यासाठी बांधकाम विभागाने (PWD) परंपरेप्रमाणे जवळपास आठशे कोटी रुपयांचे बजेट दिल्याने साडेतीनशे कोटी रुपयांच्या आतच मॉडेल रोड बसविण्याच्या सूचना देत बांधकामाच्या आततायीपणाला लगाम घातला आहे. (Model Roads budget collapsed NMC Commissioner reject Rs 800 crore road budget Nashik News)

आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रमेश पवार यांनी भूमिपुत्र म्हणून शहराचा विकास मुंबईच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेतला. शहरात अरुंद रस्ते असावे त्यासाठी प्रत्येक विभागात पहिल्या टप्प्यात दोन मॉडेल रोड तयार करण्याचे निश्‍चित करण्यात आले. मुळात सर्वच रस्ते सिमेंट-काँक्रिटचे असले पाहिजे, ही आयुक्तांची भूमिका आहे. परंतु निधीअभावी शक्य नाही. त्यामुळे ठराविक रस्ते मॉडेल बनविण्यावर भर आहे. एकदा रस्ता तयार केल्यानंतर किमान पाच वर्षे खोदला जाऊ नये. टेलिफोन, विविध प्रकारच्या केबलसाठी स्वतंत्र डक्ट, फुटपाथ, पावसाळी पाण्याचा निचरा होण्याची सोय आदी सोयी मॉडेल रस्त्यामध्ये राहणार आहे.

त्या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना बारा रस्त्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. बारा रस्त्यांसाठी तब्बल आठशे कोटींचा इस्टिमेट तयार करण्यात आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्ध नसल्याने प्रस्तावांवर फुली मारली आहे. साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांपर्यंत मॉडेल रस्ते तयार करण्यास मान्यता दिली असून, तेवढ्याच रक्कमेपर्यंत इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता नव्याने इस्टिमेट तयार केले जाणार आहे.

nmc commissioner ramesh pawar Latest Marathi News
NMC Election | अन्यथा निलंबनानंतर गुन्हे दाखल करणार : आयुक्त रमेश पवार

लिंक रोड विकासासाठी नोटीस

सातपूर विभागात मॉडेल रस्ता म्हणून विकसित करण्यासाठी बारदान फाटा ते त्र्यंबक रोड दरम्यान लिंक रोड निवडण्यात आला आहे. बारदान फाटा ते मोतीवाला कॉलेज, ध्रुवनगर, कार्बन नाका, अशोकनगर, सुला वाइन चौक, त्र्यंबक रोडपर्यंत ३६ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादनाच्या बदल्यात टीडीआर द्वारे मोबदला दिला जाणार आहे. मिळकतधारकांना महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत.

nmc commissioner ramesh pawar Latest Marathi News
इगतपुरीसह त्र्यंबकेश्‍वर अन पेठमध्ये चांगला पाऊस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com