Dipak DIve esakal
नाशिक

Nashik Crime News : दीपक दिवे खून प्रकरणी पोलिसांना दिशा मिळेना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूररोड येथील बेपत्ता दीपक दिवे याचा खून झाल्याचे निष्पन्न होऊन पाच दिवस उलटूनही संशयितांचा पोलिसांना अजूनही मागमूस लागलेला नाही. गुंतागुंतीच्या घटनांमुळे या घटनेचा उकल होण्यास विलंब होत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. (police not get erection in Deepak Dive murder case Nashik Latest Crime News)

दीपक दिवे (२७, रा. डीके नगर, गंगापूर रोड) हा गेल्या ९ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह बुधवारी (ता. १६) गंगापूर हद्दीतील गोदापात्रात तरंगताना आढळून आला. शवविच्छेदनानंतर दिवे याचा गळा आवळून व डोक्यात गंभीर मार लागून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या ९ तारखेला रात्री घडली असून, गोदापार्कवर दिवे त्याच्या काही मित्रांसमवेत मद्याची पार्टी करीत होता. त्या पार्टीला हजर असलेल्या दिवेच्या मित्रांना गंगापूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मात्र अद्यापही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत. त्यातच, त्या पार्टीला उपस्थित असलेल्यांपैकी विजय जाधव याने गेल्या १३ तारखेला विष पिऊन आत्महत्त्या केली. याप्रकारामुळे पोलिसांसमोर मोठी गुंतागुंत निर्माण झाली आहे. दिवे यास कोणी आणि का मारले याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना अद्याप मिळू शकलेली नाही. तसेच, पार्टीला असलेल्यांपैकी नेमके कोणी दिवेला मारले याचाही काही सुगावा मिळू शकलेले नाहीत. जाधव यानेच दिवेचा खून केला असावा, त्यामुळेच त्याने पोलीस चौकशीला येण्यापूर्वीच विष पिवून घेतले असावे अशीही शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तविली जात असली तर पोलीस अद्यापपर्यत कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT