Nashik : Smart Roadचा फेरीवाले, रिक्षा चालकांनी घेतला ताबा

Smart narrow road taken over by rickshaw pullers and hawkers
Smart narrow road taken over by rickshaw pullers and hawkersesakal

जुने नाशिक : रिक्षा चालक, फेरीवाले तसेच, खाद्य पदार्थ विक्रेता दुकानदारांनी स्मार्ट रोडचा ताबा घेतल्याचे चित्र दहीपूल नेहरू चौक परिसरात दिसून येते. स्मार्टसिटी विभागातर्फे करण्यात आलेल्या नियोजन शून्य कामाचे येथील स्मार्ट रोड उत्तम उदाहरण आहे. मधोमध अरुंद रस्ता आणि दोन्ही बाजूस उंच फुटपाथ यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागते. (Smart Road taken over by hawkers rickshaw driver Nashik News)

धुमाळ पॉइंट ते नेहरू चौक परिसरातील नागरिकांची आणि व्यावसायिकांची विविध समस्या सुटाव्यात, यासाठी महापालिका स्मार्ट सिटी विभाग अंतर्गत याठिकाणी स्मार्ट रोड तयार करण्यात आला आहे. परंतु, सोय पेक्षा गैरसोयीचा रस्ता अशी याची ओळख झाली आहे. त्याचे उत्तम उदाहरण दहीपूल चौक ते नेहरू चौक भागात दिसून येते. याठिकाणी पूर्वी असलेल्या रस्त्यापेक्षा अरुंद रस्ता तयार करण्यात आला आहे. तर नागरिकांसाठी दोन्ही बाजूस उंच असे फुटपाथ तयार करण्यात आले आहे.

त्यात एका बाजूला खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. तर दुसऱ्या बाजूस अन्य व्यावसायिकांनी त्यांचे वाहने लावून फुटपाथ आहे. त्यापेक्षाही अरुंद केले आहे. त्यामुळे नागरिक फुटपाथवरून चालण्यापेक्षा खालील रस्त्यावरून चालणे पसंत करत आहे. त्याठिकाणी चालतानाही नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्या रस्त्याचा एका बाजूचा ताबा रिक्षा चालकांनी घेतला आहे. फेरीवाले त्यांचे हातगाडे तसेच, खरेदीसाठी आलेले नागरिक त्यांच्या दुचाकी त्याठिकाणी पार्क करत आहे.

Smart narrow road taken over by rickshaw pullers and hawkers
Indian Railway: मुंबईतील मेगा ब्लॉकमुळे सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकला थांबली

आधीच पूर्वीपेक्षा अरुंद असलेला रस्ता यामुळे आणखी अरुंद होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणे. पायी चालणाऱ्या नागरिकांना वाहनांचा धक्का लागणे असे प्रकार वारंवार घडत आहे. महापालिका अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.--चौकट--रामरथास झाली अडचणया अरुंद रस्त्यामुळे येथून मार्गक्रमण होणाऱ्या रामरथाची देखील अडचण झाली आहे. वर्षातून एक वेळेस पंचवटी काळाराम मंदिर येथून रामरथ काढण्यात येतो.

गणेशवाडी, दहीपूल, धुमाळ पॉइंट, मेन रोड, बोहरपट्टी अशा विविध भागातून रथाचे मार्गक्रमण होत असते. पूर्वी मोठा रस्ता असताना देखील भाविकांची चेंगराचेंगरी होत असते. आता तर या अरुंद स्मार्ट रोडमुळे अडचणीत वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी याभागातून रथाची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळेस रथास अतिशय अडचण निर्माण झाली होती

Smart narrow road taken over by rickshaw pullers and hawkers
Nashik Love Jihad Update : अखंड हिंदू समाजातर्फे पोलिसांना निवेदन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com