Vikram Deshmane and Datta Karale esakal
नाशिक

Police Transfer: पोलीस अधीक्षकपदी विक्रम देशमाने; उमाप यांची बदली! दत्ता कराळे नाशिकचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील पोलीस दलामध्ये बदल्यांचे सत्र सुरू आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची पदोन्नतीने पोलीस उपमहानिरीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त पदावर मुंबईत तर, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांची बदलीचे आदेश गृहविभागामार्फत जारी करण्यात आले आहेत. (Police Transfer Vikram Deshmane as Superintendent of Police Umap replacement Dutta Karale new Special Inspector General of Police of Nashik)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील पोलीस दलामध्ये बदल्यांचे सत्र सुरू आहे. त्यानुसार, गेल्या काही दिवसात पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्तांपासून ते उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

तर, गृहविभागाने बुधवारी (ता. ३१) राज्यातील अपर पोलीस महासंचालक ते पोलीस उपमहानिरीक्षक या पदांवरील सुमारे ६४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

त्यानुसार, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची अपर पोलीस आयुक्त या पदावर पदोन्नतीने मुंबईतील विशेष शाखेत बदली झाली आहे. तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. देशमाने हे २०१२ ते १४ या दरम्यान नाशिक ग्रामीणला अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

त्याचप्रमाणे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांचीही बदली झाली असून त्यांची पदस्थापना करण्यात आलेली नाही.

तर, ठाणे शहराचे पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नाशिक परिक्षेत्रात नवीन विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे. कराळे यांनी यापूर्वी नाशिक शहर आयुक्तालयात उपायुक्त तर, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे.

डॉ. सिंगल नागपूरचे आयुक्त

या बदल्यांमध्ये राज्य रस्ता महामार्ग विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

त्याचप्रमाणे, दीपक पांडे यांची महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालकपदी, संजय दराडे यांची कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी, जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची सोलापूरचे पोलीस आयुक्तपदी, एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची जळगाव पोलीस अधीक्षकपदी यांच्याही बदल्यांचे आदेश जारी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT