Senior Police Officers Transfers: लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील ४४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, संपूर्ण यादी पाहा...

Senior Police Officers Transfers: महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने पोलिस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.
Senior Police Officers Transfers:
Senior Police Officers Transfers:

Senior Police Officers Transfers: महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने पोलिस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रितेश कुमार यांच्याकडे राज्याच्या होमगार्ड महासमादेशकाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून बुधवारी (ता. ३१) रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

अमितेश कुमार १९९५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रितेश कुमार भारतीय पोलिस सेवेतील १९९२च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी १६ डिसेंबर २०२२ रोजी पुणे शहर पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका), एमपीडीए कायद्यान्वये गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला.

शहरातील ११५ गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोका कायद्यान्वये कारवाई केली. तसेच १०० सराईत गुन्हेगारांना विविध कारागृहात स्थानबद्ध केले. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची प्रभावी कारवाई करणारे रितेश कुमार पहिलेच पोलिस आयुक्त आहेत. इसिसच्या दहशतवाद्यांकडून शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट पुणे पोलिसांनी उधळून लावला होता. त्याबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) रितेश कुमार यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले होते. त्यांनी कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील १७ जणांवर मोका कायद्यान्वये कारवाई केली.

पुण्याच्या पोलिस सहआयुक्तपदी प्रवीण पवार-

कोकण परिक्षेत्र, नवी मुंबईचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची पुणे शहराच्या पोलिस सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी बदली झाली होती. त्यानंतर पोलिस सहआयुक्तपद रिक्त होते. (Latest Marathi News)

Senior Police Officers Transfers:
Champai Soren: हेमंत सोरेन यांचा राजीनामा; चंपाई सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री

राज्यातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या-

प्रभात कुमार (अतिरिक्त महासंचालक व उपमहासमादेशक, होमगार्ड मुंबई ते संचालक नागरी संरक्षण, मुंबई), रवींद्र कुमार सिंगल (अतिरिक्त महासंचालक, वाहतूक, मुंबई ते पोलिस आयुक्त नागपूर शहर), शिरीष जैन (सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई ते आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), दीपक पांडे (विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग, मुंबई ते अतिरिक्त महासंचालक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबई), दत्तात्रेय कराळे (पोलिस सहआयुक्त, ठाणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र), संजय शिंदे (पोलिस सहआयुक्त, पिंपरी चिंचवड ते विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), प्रवीणकुमार पडवळ (पोलिस सहआयुक्त, वाहतूक, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई)

संजय दराडे (विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई), ज्ञानेश्वर चव्हाण (विशेष पोलिस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र ते पोलिस सहआयुक्त, ठाणे शहर), एस.डी. ऐनपुरे (विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण, मुंबई ते पोलिस सहआयुक्त, नवी मुंबई), एन.डी. रेड्डी (पोलिस आयुक्त अमरावती ते पोलिस आयुक्त, अमरावती शहर-पदोन्नतीने), संदीप पाटील (पोलिस उपमहानिरिक्षक, गडचिरोली परिक्षेत्र ते विशेष पोलिस महानिरीक्षक, नक्षल विरोधी अभियान, नागपूर), वीरेंद्र मिश्रा (अतिरिक्त आयुक्त, विशेष शाखा, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र), रंजन कुमार शर्मा (अतिरिक्त आयुक्त, उत्तर विभाग, पुणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

नामदेव चव्हाण (पोलिस उपमहानिरिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, नागपूर), राजेंद्र माने (पोलिस आयुक्त, सोलापूर ते सहसंचालक, महाराष्ट्र अकादमी, नाशिक), विनिता साहू (समादेशक, राखीव पोलिस बल, दौंड, पुणे ते अतिरिक्त आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, मुंबई), एम. राजकुमार (पोलिस अधीक्षक जळगाव ते पोलिस आयुक्त, सोलापूर), अंकित गोयल (पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र), बसवराज तेली (पोलिस अधीक्षक सांगली ते पोलिस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), शैलेश बलकवडे (समादेशक, राखीव पोलिस बल पुणे ते अतिरिक्त आयुक्त-गुन्हे पुणे), शहाजी उमाप (पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण ते अतिरिक्त आयुक्त, विशेष शाखा, मुंबई), एस.जी. दिवाण (समादेशक, राखीव पोलिस बल, कोल्हापूर ते पोलिस उपमहानिरीक्षक, पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, पुणे), संजय शिंत्रे (पोलिस अधीक्षक, सायबर, मुंबई ते पोलिस उपमहानिरीक्षक, दक्षता, वस्तु व सेवा कर विभाग, मुंबई),

मनोज पाटील (पोलिस उपायुक्त, मुंबई ते अतिरिक्त आयुक्त, उत्तर विभाग, पुणे शहर), विक्रम देशमाने (पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण ते पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण), पंकज देशमुख (पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण), एम.सी.व्ही. माहेश्वरी रेड्डी (पोलिस उपायुक्त, मुख्यालय, मुंबई ते पोलिस अधीक्षक, जळगाव), अजय कुमार बन्सल (पोलिस आयुक्त, मुंबई ते पोलिस अधीक्षक जालना), रवींद्रसिंह परदेशी (पोलिस अधीक्षक, चंद्रपूर ते पोलिस अधीक्षक, परभणी), रागसुधा आर. (पोलिस अधीक्षक, परभणी ते पोलिस उपायुक्त, मुंबई), संदीप घुगे (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते पोलिस अधीक्षक, सांगली), मुमक्का सुदर्शन (पोलिस उपायुक्त, नागपूर शहर ते पोलिस अधीक्षक, चंद्रपूर),

धोंडोपंत स्वामी (पोलिस उपायुक्त, मुंबई ते पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण), पंकज कुमावत (पदस्थापनेच्य प्रतीक्षेत ते अतिरिक्त पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण), मितेश घट्टे (अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते पोलिस उपायुक्त, मुंबई), विक्रम साळी (अतिरिक्त पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते सहायक पोलिस महानिरीक्षक, नियोजन व समन्वय, पोलिस महासंचालक कार्यालय मुंबई), आनंद भोईटे (अतिरिक्त पोलिस अधीक्षक, बारामती ग्रामीण ते पोलिस उपायुक्त, मुंबई), संदीप पखाले (अतिरिक्त पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण ते पोलिस अधीक्षक, विशेष कृती गट, नक्षलवाद विरोधी अभियान, नागपूर), रमेश धुमाळ (सहायक पोलिस महानिरीक्षक, नियोजन व समन्वय, मुंबई ते अतिरिक्त पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण), समाधान पवार (सहआयुक्त (दक्षता) अन्न व औषध प्रशासन, मुंबई ते पोलिस उपायुक्त, मुंबई). नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांची बदली करण्यात येत असून, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

Senior Police Officers Transfers:
Maratha Reservation : पुणे शहरात मराठा समाज सर्वेक्षणाचे काम ८२ टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com