pomegranates Sakal
नाशिक

कोरोनाच्या संकटात डाळिंबाने दिली बळीराजाला साथ!

प्रमोद सावंत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फळ शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. टरबूज, खरबूज, पपई, पेरू, बोर, काकडी, शेवगा, संत्री आदी फळपिके कवडीमोल किमतीत विकावे लागले. गेल्या वर्षाप्रमाणेच या वर्षीदेखील डाळिंबाने शेतकऱ्यांना साथ दिली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डाळिंबाचे भाव ७० ते ८० रुपये किलोपर्यंत टिकून राहिले.

मालेगाव (जि. नाशिक) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona second wave) शेती पिकांना मोठा फटका बसला. विशेषतः फळ शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. टरबूज, खरबूज, पपई, पेरू, बोर, काकडी, शेवगा, संत्री आदी फळपिके कवडीमोल किमतीत विकावे लागले. गेल्या वर्षाप्रमाणेच या वर्षीदेखील डाळिंबाने शेतकऱ्यांना साथ दिली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डाळिंबाचे भाव ७० ते ८० रुपये किलोपर्यंत टिकून राहिले. डाळिंबाने साथ दिली असली तरी या वर्षी कसमादे भागात म्हणावा तसा माल उपलब्ध नव्हता. (Good price for pomegranate during Corona period)

डाळिंबाएवढा पैसा कोणत्याच फळपिकात नाही

तेल्या व मर रोग हद्दपार झाल्यानंतर कसमादेत डाळिंबाने पुन्हा उभारी घेतली आहे. दर वर्षी लागवडीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी फळ पिकांमध्ये अनेक प्रयोग केले. मात्र, डाळिंबाएवढा पैसा कोणत्याच फळपिकात मिळत नाही. शेतकरी डाळिंबाकडे वळाल्यामुळे या फळ पिकावरील कुशल कामगारांनाही हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी कोरोना लॉकडाउनमुळे (Lockdown) फळपिके मिळेल त्या किमतीत विकली गेली. या वर्षीदेखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फळ पिकांची वाट लागली. एप्रिल, मे महिन्यात टरबूज, खरबुजांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या बेतानेच शेतकऱ्यांनी लागवड केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाउनमुळे ग्राहक घराबाहेर पडले नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांना उत्पादनखर्च देखील मिळाला नाही. संत्री ४० रुपये किलोप्रमाणे विकावी लागली.

लॉकडाउन नसता, तर भाव शंभराच्या वर असता

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही डाळिंबाने बळीराजाला साथ दिली. दिल्ली, कोलकता, बेंगलोर, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, इंदूर आदी मोठ्या बाजारपेठा बंद असतानाही डाळिंबाला ७० ते ८० रुपये किलोपर्यंत भाव मिळाला. लॉकडाउन राहिला नसता, तर हाच भाव शंभराच्या वर राहिला असता. तालुक्यासह कसमादे भागात बहुसंख्य शेतकऱ्यांनी डाळिंबाचा मृग बहार धरला आहे. मृग बहाराला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

(Good price for pomegranate during Corona period)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! आयात शुल्क वाढीनंतर आज सर्वात कमी दर; उच्चांकापासून तब्बल 23 हजारांनी स्वस्त; पाहा ताजे भाव

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Sugarcane farmers: नेत्यांच्या साखरसाम्राज्यात अडकले शेतकऱ्यांच्या घामाचे २१८ कोटी; सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटींची थकबाकी

Firefly Festival: काजवा महोत्सवाची परदेशी पर्यटकांना भुरळ; जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील निसर्गप्रेमी अकोल्यात

Rajat Patidar: ट्रॉफी जिंकताच कॅप्टन रजत पाटीदारचा मोठा खुलासा, हे सगळं आधीच ठरलेलं होतं' म्हणत नेमकं काय बोलून गेला? पाहा..."

SCROLL FOR NEXT