ZP Nashik  esakal
नाशिक

Nashik ZP news : माध्यमिकचा पदभार प्रवीण पाटील यांच्याकडेच

माध्यमिकचा पदभार प्रवीण पाटील यांच्याकडेचजिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारीपदाचा पदभार प्रवीण पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय ‘मॅट’ने दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP news : माध्यमिकचा पदभार प्रवीण पाटील यांच्याकडेचजिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारीपदाचा पदभार प्रवीण पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय ‘मॅट’ने दिला आहे.

पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांचा पदभार काढून घेत उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडे पदभार दिला होता. (Praveen Patil is in charge of Secondary nashik zp news)

त्याविरोधात पाटील यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. त्यात झालेल्या सुनावणीत हा पदभार पाटील यांच्याकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हा निर्णय म्हणजे जिल्हा परिषद प्रशासनाला दणका मानला जात आहे. यापूर्वीही पाटील यांची प्रशासनाने शासनाकडे तक्रार करत बदली केली होती. त्या वेळीही पाटील यांनी ‘मॅट’कडून स्थगिती मिळविली होती.

महात्मा गांधी विद्यामंदिर, आदिवासी सेवा समिती संस्थेतील भरती प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे विश्वास्त मंडळ यांसह माध्यमिक शिक्षणाधिकारी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा माध्यमिकचा पदभार काढून घेत उपशिक्षणाधिकारी देवरेंकडे सोपविला होता.

पदभार हा समकक्ष अधिकाऱ्याकडे सोपविणे जाणे अभिप्रेत असताना शासन नियम डावलून तो देवरेंकडे सोपविल्याने पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यावर, प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले. यात प्रशासनाने केलेली कार्यवाही योग्य असल्याचे सांगण्यात आले. यातच, नियमबाहय शिक्षक भरती प्रकरणी शासनाची फसवणूक केल्याने तत्कालीन शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, शिक्षण उपसंचालक अधिक्षक असलेले देवरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

मात्र, त्यांचा पदभार काढला गेला नाही. दरम्यानच्या काळात पाटील नियमित कार्यालयात येत. त्यावर दोघांनी प्रशासनाला पत्र देत एकमेकांविरोधात तक्रारी झाल्या. यातच येवला येथे झालेल्या मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी उपाशिक्षणाधिकारी यांच्याकडूनही पदभार काढून घेण्याबाबत सूचना प्रशासनाला केल्या होत्या.

असे असताना पाटील यांनी ‘मॅट’कडे धाव घेत याचिका दाखल केली होती. यात सुनावणी होऊन त्यात पाटील यांच्याकडे पदभार सोपवावा, असे निर्देशित देण्यात आले. प्रविण पाटील यांचे पत्र प्राप्त झाल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शिक्षणाधिकारी पाटील यांचे प्रशासनाला पत्र

‘मॅट’कडून शिक्षणाधिकारी पदाचा पदभाराबाबत झालेला निर्णय, ‘मॅट’चे आदेश याबाबतचे पत्र प्रशासनाला दिले आहे. यात शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना उपाशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेला अतिरिक्त पदभार देण्याचा निर्णय नियमबाह्य आदेश रद्द करीत पदभार पाटील यांच्याकडे ठेवावे, असे आदेशित केले आहे. त्यामुळे हा पदभार माझ्याकडे राहील, असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT